तिजोरीत ‘या’ 3 वस्तू ठेवा; धन-संपत्तीत होईल वाढ

Diwali 2024 | घरात पैसे, महत्त्वाच्या वस्तू-कागदपत्रे ठेवण्यासाठी तिजोरीचा वापर केला जातो. घराच्या तिजोरीबाबत काही नियम  सांगण्यात आले आहेत. हे नियम पाळल्यास तुमच्या धन-संपत्तीत वाढ होईल.

दिवाळीला देवी लक्ष्मीची पूजा करतात. या दिवशी धनलाभासाठी विशेष उपाय केले जातात. त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या तिजोरीत काही वस्तू ठेवल्या तर तुम्हाला कधीही पैशांची कमतरता भासत नाही असं म्हणतात. तिजोरीचा संबंधसुद्धा धनाशी संबंधित लावण्यात आला आहे. तसे, आपण पैसे पर्स किंवा पाकिटातही ठेवतो. पण, साठवलेला पैसा, दागिने यांसारख्या गोष्टी आपण तिजोरीतच ठेवतो.

दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच तिजोरीत काही वस्तू नक्की ठेवाव्यात. यामुळे आर्थिक समस्या दूर होते. मान्यतेनुसार, तिजोरीत या वस्तू ठेवल्या तर ती कधीच रिकामी राहत नाही.

Diwali 2024 | तिजोरीत ‘या’ 3 वस्तू ठेवा

पूजा करताना तुम्ही जी सुपारी चढवता ती सुपारी तिजोरीत ठेवावी. पूजेत ठेवलेल्या सुपारीला गौरी-गणेशाचं रुप मानलं जातं. त्यामुळे सुपारी लाल रंगाच्या कापडात बांधून तिजोरीत ठेवावी.

तिजोरीत 10 रुपयांच्या नोटांचा बंच ठेवणं फार शुभ मानलं जातं. जर तुम्ही हा बंच नाही ठेवू शकत असाल तर एक पितळेचं, तांब्याचं किंवा चांदीचं नाणंसुद्धा ठेवू शकता. गोमती चक्रसुद्धा तिजोरीत ठेवणं शुभ मानलं जातं.

महत्त्वाच्या बातम्या- 

जब्याला मिळाली शालू!, राजेश्वरी खरात आणि सोमनाथ अवघडे अडकणार लग्नबंधनात?

दादांचा शिलेदार कोंडीत, सुनील शेळकेंच्या अडचणी आणखी वाढल्या

मोठी बातमी! प्रचाराला निघालेल्या ठाकरेंच्या ‘या’ उमेदवाराला हृदयविकाराचा झटका

मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

अजित पवारांना धक्का, सोलापुरात तब्बल ‘इतक्या’ नेत्यांनी हाती घेतली तुतारी