बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिवाळी सुट्ट्या जाहीर! राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार ‘इतक्या’ दिवस सुट्ट्या

मुंबई | कोरोना महामारीमुळे संपूर्ण देश लॉक करण्यात आला होता. त्यामुळे देशभरातील शाळांना जवळपास दीड वर्ष कुलुप लावण्यात आलं होतं. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच देशातील शाळांची कुलुपे उघडण्यात आली आहेत. पुढील महिन्यात दिवाळी सण येत आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यातील विद्य़ार्थ्यांना दिवाळीच्या सुट्या जाहीर आल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अलिकडेच राज्यातील पहिली ते बारावी विद्य़ार्थ्यांना दिवाळीच्या सुट्या जाहीर केल्या आहेत.

2020 ते 2021 या शैक्षणिक वर्षात पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2021 या दरम्यान दिवाळी सणासाठी सुट्टी जाहीर केली आहे. तसेच या कालावधीत शाळांकडून सुरू असलेले ऑनलाईन शिकवण्याचे वर्ग देखील बंद राहणार आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने परिपत्रक काढले आहे.

पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यामिक शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र राज्यातील महाविद्यालये सुरू होण्यास बऱ्याच वेळ लागला. मुंबई, पुणे ठाणे शहरासह राज्यातील इतर शहरात 4 ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. तसेच दिवाळी निमित्तीने हे वर्ग देखील काही दिवस बंद राहणार आहेत.

दरम्यान, देशातील शाळा सुरू होताच अनेक राज्यातील विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या घटना अलिकडेच घडल्या होत्या. त्यामुळे प्रशासनासमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळांना लसीकरण करण्यासंदर्भात सूचना देखील दिल्या होत्या.

पाहा ट्विट

थोडक्यात बातम्या-

“फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याची अवस्था मला बघवत नाही”

द बर्निंग बस! भर रस्त्यात बसने अचानक घेतला पेट अन्…

“टीकाकारांनी टीका केली पण स्वत: सरकारनेच उत्तर दिलंय”

“असा महापुरुष धरतीवर एकदाच येतो, मोदी साधारण व्यक्ती नाही तर देवाचा अवतार”

सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला दणका! पेगासस प्रकरणी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More