बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! महागाई भत्त्यासह ‘दिवाळी भेट’ही मिळणार

मुंबई | कोरोना काळात एसटी कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बघावली होती. मात्र, आर्थिक टंचाईमुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकले होते. अशातच एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर आता ठाकरे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळसाठी राज्य सरकार विविध उपाययोजना राबवताना दिसत आहे. अशातच आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळसाठी 112 कोटींचा निधी देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यानंतर आता हा निधी वितरीत करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागला होता. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन देखील थकले होते. अशातच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ देखील करण्याच आली आहे. दिवाळी भेट म्हणून अधिकाऱ्यांना 5 हजार आणि कर्मचाऱ्यांना 2500 रूपये देण्यात येणार असल्याचं घोषणा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने महामंडळाने तिकीटाच्या किंमतीत वाढ झाली होती. त्यामुळे एसटीला आर्थिक संकटाला तोंड देण्यास बळ मिळणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“त्यांना अटक करू नये, त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवावं”

“विराटने खेळभावनेने पराभव स्वीकारला, मला त्याचं कौतुक वाटतंय”

दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये खळबळ! ‘या’ दिग्गज खेळाडूला संघातून वगळलं

मोठी बातमी! ड्रग्स प्रकरणात पहिला जामीन मंजूर; आर्यन खानला सुट्टी नाहीच

“नरेंद्र मोदींच्या नावावर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More