बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

यंदा पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, मुरलीधर मोहोळ यांनी केली मोठी घोषणा!

पुणे | केंद्र सरकारने 1 जानेवारी 2016 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. त्यानूसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचे लाभ दिले जातील, असं केंद्र सरकारने यापूर्वी सांगितलं होतं. अशातच आता पुणे महानगरपालिकेने आपल्या 17 हजार कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. गुरूवारी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

गुरूवारी पुणे महानगरपालिकेच्या नगरविकास विभागानं तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली. त्यामुळे पुणे पालिकेतील कर्मचाऱ्यांची यंदा दिवाळी गोड होणार आहे.  या निर्णायानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एकनाथ शिंदे यांचे देखील आभार मानले आहेत.

पुणे महापालिकेच्या जवळपास 17 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. आपल्या या प्रस्तावाला राज्य सरकारने अंतिम मंजूरी दिली. यासाठी मुख्यसभेकडून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता, असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे. याबाबत मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

दरम्यान, माझ्यासह विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्या सरकारशी पत्रव्यवहार करून सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली होती. त्याला अंतिम मंजूरी दिल्याबद्दल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे मन:पूर्वक धन्यवाद, असंही मुरलीधर मोहोळ म्हणाले.

 

थोडक्यात बातम्या-

विराट कोहलीने ‘या’ 4 जणांशी चर्चा करत घेतला कर्णधारपद सोडण्याचा निर्णय!

…अन् नो बाॅलवर माझी विकेट पडली – संजय राठोड

मोठी बातमी! विराट कोहली सोडणार भारतीय संघाचं कर्णधारपद

…म्हणून गडकरींनी आपल्या सासऱ्यांच्याच घरावर चालवला बुलडोझर; कार्यक्रमात सांगितला ‘तो’ खास किस्सा

‘भाजपमध्ये दरेकरांसारख्या नेत्यांचा….’; राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताच सुरेखा पुणेकर कडाडल्या!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More