बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विराटसेनेची चिंता वाढली! भारताचा ‘हा’ खेळाडू रुग्णालयात भरती

मुंबई | बहुप्रतिक्षित विश्वचषक सामन्यांना अखेर सुरूवात झाली आहे. काल भारताचा पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी झाला. या सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट समर्थक नाराज आहे. अशातच आता भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

भारत पाकिस्तान सामना सुरू असताना अखेरच्या काही षटकात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मैदानात आला. अखेरच्या काही षटकात त्याच्याकडून तुफान फटकेबाजीची अपेक्षा होती. मात्र, हार्दिक पांड्याला काही खास कामगिरी करता आली नाही. या सामन्यात दोन धावा घेताना हार्दिकच्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर हार्दिकला रूग्णालयात नेण्यात आलं.

भारत पाकिस्तान सामना झाल्यानंतर हार्दिकला त्वरित रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्याच्या खांद्याचा स्कॅन देखील घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता येत्या काळात हार्दिक भारतीय विश्वचषक संघात असणार आहे की नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याला काही खास कामगिरी करता आली नाही. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने गोलंदाजी देखील केली नव्हती. त्यामुऴे त्याला भारतीय संघात स्थान देणं कितपत योग्य आहे?, असा सवाल क्रिकेट तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

‘शमी आम्ही तुझ्यावर प्रेम करतो’; शमीवर टीका करणाऱ्यांना दिग्गजांनी झापलं

तुमचंही कमी वयात टक्कल पडतंय का? जाणून घ्या कारण

“बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं म्हणून सांगतील”

“…म्हणून या नाना पटोलेला गरिबाचं दु:ख जास्त कळतं”

आयपीएलला मिळाले 2 नवे संघ! आयपीएल इतिहासातील विक्रमी बोली लागली

”ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल करणार’; नितेश राणेंचा थेट इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More