लग्नाच्या दीड महिन्यानंतर बेबी बम्पसह फोटो शेअर करत दियाने दिली गुड न्यूज!
मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा पहिल्यांदाच आई होणार आहे. दियाने मालदिवहून फोटो पोस्ट करून आपण गरोदर असल्याचं जाहीर केलं आहे. बेबी बम्पसह फोटो शेअर करत दियाने दिली गुड न्यूज दिली आहे.
मी पृथ्वी मातेसारखीच एक दिवस आई होणार आहे. आयुष्य, ही प्रत्येक गोष्टीची सुरुवात आहे. प्रत्येक कथेची, प्रत्येक रोपट्याची सुरुवात आहे. सर्व स्वप्नांपैकी एक असून, आशेचा किरण आहे, माझ्या गर्भाशयाच्या माध्यमातून हे सर्वात पवित्र शुद्ध स्वप्न सत्यात उतरणार आहे, त्याबद्दल मी देवाची आभारी आहे, असं दियाने म्हटलंय.
दियाने फेब्रुवारीमध्ये वैभव रेखीशी लग्न केले आणि आता ती पहिल्यांदाच आई होणार आहे. दिया सध्या मालदिवमध्ये तिचा हनीमून साजरा करतीये. दिया मिर्झाचे हे दुसरे लग्न आहे. तसेच पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर दियाने व्यावसायिक वैभव रेखीशी लग्न केलंय. वैभव रेखी मोठा बिझनेसमॅन व इनव्हेस्टर आहे. वैभव रेखी हा मुंबईतील सगळ्यात प्रसिद्ध समजल्या जाणा-या पाली हिल परिसरात राहातो.
दिया मिर्झाच्या या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच दियाला अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोलही केलं आहे.
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या-
BCCI चा उद्धटपणा; विराट कोहलीने केलेल्या त्या टीकेला BCCI चं प्रत्युत्तर
धक्कादायक! मुलानं आत्महत्या केली तिथेच आईनेही आयुष्य संपवलं
अभिनेते कादर खान यांच्या मोठ्या मुलाचं कॅनडामध्ये निधन!
पुणे पोलिसांचा ‘मोक्का पॅटर्न’; 175 गुन्हेगारांवर केली धडक कारवाई
“नरेंद्र मोदींनी छळ केल्यानेच सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा मृत्यू झाला”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.