बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ कारणामुळे मुख्याध्यापकाचा पगारच कापला, कारण ऐकून नेटकरी संतापले

पटना | लखिसराई जिल्ह्यातील बालगुदार गावतील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत जिल्हा दंडाधिकारी संजय कुमार सिंग (Sanjay Kumar Singh) यांनी शाळेला औपचारीक भेट दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक निर्भय कुमार सिंग (Nirbhav Kumar Singh) यांना सदरा लेंग्यात पाहून ते संतापले. मुख्याध्यापक यांनी नेहमीचा बिहारी पेहराव केला होता. दंडाधिकाऱ्यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. तसेच त्यांचा पगारात देखील कपात करण्याचे आदेश दिले आहेत.

यावेळीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. त्यातून अनेकजण मुख्याध्यापकांनी भारतीय पेहराव केला आहे. त्यात गैर काय? असा प्रश्न विचारत आहेत. तर व्हिडीओत दंडाधिकारी मुख्याध्यापकांना ओरडताना दिसत असून हड-तूडची देखील भाषा वापरत आहेत. यावरुन सगळीकडे टीका केली जाते आहे. दंडाधिकारी संजय कुमार सिंग मुख्याध्यापकांना तुम्ही शिक्षक दिसत नसून स्थानिक राजकारणी वाटत आहात, असे म्हणत आहेत.

दंडाधिकारी यांनी त्याचवेळी संबंधितांना संपर्क करत तुमचा मुख्याध्यापक माझ्यासमोर सदरा लेंगा घालून बसला आहे, तसेच तो मुलांना शिकवत देखील नाही. अशी तक्रार करताना दिसत आहेत. इतर शिक्षकांनी या प्रकरणात तोंड घालण्याचा प्रयत्न केला तर त्यांना दंडाधिकारी सिंग यांनी गप्प केले. तुम्ही शिक्षक आहात तर शिक्षकांसारखे दिसायाला पाहीजे असे दंडाधिकारी बोलले.

दंंडाधिकाऱ्यांनी यावेळी वर्गखोल्या आणि शाळा तपासली. यावेळी त्यांची घोर निराशा झाली. वर्गात लाईट आणि स्वच्छता नसल्याने ते मुख्याध्यापकांवर आणखी चिडले. टिचर इलिजीबिलीटी टेस्ट (TET) शिक्षक संघाचे अघ्यक्ष अमित विक्रम यांनी याविषयी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यात शिक्षकांसाठी एक ड्रेस कोड आहे. धोतर, सदरा, लेंगा किंवा पायजमा हे भारतीय संस्कृतीतील कपड्यांचे प्रकार आहेत. आणि ते परिधान केल्याने कोणत्याही शिक्षकाचा पगार कापला जाऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया अमित विक्रम यांना दिली.

थोजक्यात बातम्या –

‘उद्धव ठाकरेंच्या जागी दुसरं कोणी असतं तर…’, अपक्ष आमदाराचं मोठं वक्तव्य

शिवसेनेची हकालपट्टी मोहीम सुरुच, आणखी एका बंडखोर आमदाराला दिला नारळ

‘अब सभी को सभी से खतरा है’, संजय राऊतांच्या ट्विटने खळबळ

आता विमानप्रवास करा फक्त 26 रुपयांत, व्हिएतजेट एअरलाईन्सची खास ऑफर

‘हजारो रुपयांची दाढी कटींग करून पैश्यांच्या जोरावर आलेलं हे सरकार’, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More