आता राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार; पाहा कुणी केली ही घोषणा…

चेन्नई | डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी सोनिया गांधी यांच्यासमोरच महाआघाडीकडून राहुल गांधीना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केलं आहे.

डीएमके नेते करूणानिधी यांच्या पुतळ्याचे अनावरण काल चेन्नईत सोनिया गांधी यांच्या हस्ते पार पडलं. त्यावेळी एम. के. स्टॅलिन बोलत होते.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली राजकीय परिपक्वता सिद्ध केली असून, पंतप्रधान मोदींना हरवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे, असंही स्टॅलिन म्हणाले आहेत.

दरम्यान, एम. के. स्टॅलिन यांनी राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –

-राहुल गांधींनी ‘पप्पू’ नाही तर आता ‘पप्पा’ होण्याची गरज – रामदास आठवले

-ज्यांनी मला अटक केली त्यांनाच माझ्या अटकेचं कारण माहित नाही! – छगन भुजबळ

-विराट कोहलीला बाद ठरवण्याचा पंचांचा निर्णय साफ चुकीचा; सोशल मीडियावर एकच राडा

-मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका; अजित पवारांची कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती

-कोण जिंकणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी?, काय आहे सद्यस्थिती???