…आणि पारधी समाजावर चित्रपट काढणाऱ्या माणसाला भर सभागृहात रडू कोसळलं!

पुणे | चौदा महिने तेरा दिवस या ज्ञानेश्वर भोसले यांच्या आत्मचरित्रावर आधारित सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. पारधाड असं या सिनेमाचं नाव आहे. 

ज्ञानेश्वर भोसले यांनीच या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. गुरुवारी पुण्यातील मंगला सिनेमागृहात या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. 

पारधी समाजावर आधारित या चित्रपटाबद्दल बोलताना ज्ञानेश्वर भोसले यांना रडू कोसळलं.  त्यामुळे संपूर्ण सभागृह काही काळ भावनिक झालं होतं. 

दरम्यान, पारधी समाज हा भटका समाज आहे. त्यांची होणार परवड आणि स्वातंत्र्यानंतरही पारतंत्र्यात असल्यासारखी त्यांना मिळणारी वागणूक यावर या सिनेमात भाष्य करण्यात आलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-परिवर्तन यात्रेत अजित पवारांची बैलगाडी; सारथ्य धनंजय मुंडेंच्या हाती! 

-कॉफी महागात पडली; हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुलचं निलंबन

-“आज…देवेंद्र फडणवीसांच्या घाशिराम कोतवालाचा नवा प्रयोग पहायला मिळाला” 

-अमित ठाकरेंच्या लग्नाचं राहुल गांधींना निमंत्रण; नरेंद्र मोदींना मात्र नाही!

-अजित पवार नव्हे शिरुरमधून श्रीनिवास पाटील राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार?