वजन कमी करण्यासाठी नाष्ट्यामध्ये खा ‘हा पदार्थ आहार

मुंबई । वजन कमी करण्यासाठी काहीजण रोज सकाळी व्यायाम करत असतात. तर काहीजण घरघुती उपचार करत असतात. त्यात काहीजण डायट इतकं फॉलो करून सुद्धा त्यांच्या वजनात घट होत नाही.

वजन कमी करण्यासाठी काहीजण वेळच्यावेळेवर आणि हेल्दी वेल्दी नाश्ता घेत असतात. दरम्यान, माध्यमांच्या माहितीनुसार भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी सांगितलं की, ओट्सचा आहार तुम्ही नाश्ट्यासाठी घेऊ शकता.

त्याचं कारण असं की ओट्स हा एक अतिशय आरोग्यदायी पर्याय आहे. या मध्ये व्हिटॅमिन ई, फॅटी ॲसिड आणि फायबर सारखे महत्वाचे पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

ज्यांच वजन वाढतं किंवा ज्यांना मधुमेहचा त्रास आहे त्यांनी ओट्स खाणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी हा नाश्ता एकदम आरोग्यदायी आहे. कारण हे वजन कमी करण्याचे आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचं काम करतं.

त्यासोबतच ओट्स खाल्याने त्यामधील आढळले फायबर पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. जर तुम्ही रोज ब्रेकफास्टमध्ये ओट्स खाण्यास सुरुवात केली तर बद्धकोष्ठतेसारखी समस्या उद्भवणार नाही.

थोडक्यात बातम्या-

आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नंबर?, भाजप नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

“या म्हशीच्या स्वप्नात रेडा येत असेल तर आम्ही काय करणार”

कसबा, चिंचवडमध्ये मतदानाला सुरूवात; मतदार ठरवणार उमेदवारांचं भवितव्य?

“विधानसभेच्या 200 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू”

“अजित पवार माझ्या नादाला लागू नका, पुण्यात येऊन बारा वाजवीन”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More