अहमदनगर | राज्यात सर्वत्र तीव्र दुष्काळ असताना सत्कार सोहळ्यासाठी कोणताही पैसा खर्च न करता कार्यकर्त्यांनी तो पैसा दुष्काळ निवारणासाठी खर्च करावा, असं आवाहन भाजपचे नवनिर्वाचित खासदार सुजय विखे यांनी केलं आहे.
सुजय विखेंचा गुरुवारी सायंकाळी कर्जतमध्ये सत्कार करण्यात आला. त्यांचा सत्कार समारंभ पालकमंत्री राम शिंदे यांनी आयोजित केला होता.
राम शिंदेंनी सत्कार समारंभ आयोजित केल्याने मी स्विकरतो. मात्र हा सत्कार शेवटचा समजावा. यापुढे कोणीही सत्काराचे आयोजन करु नये, असं सुजय विखे म्हणाले आहेत.
जिल्यात दुष्काळाची दाहकता असताना सत्कारासाठी खर्च करणं योग्य नाही. हा पैसा दुष्काळ निवारणासाठी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’त जमा करावा, असं आवाहन विखेंनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
-काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधींची निवड
-मुस्लीम या देशात भाडेकरु नाही तर भागीदार- असदुद्दीन ओवैसी
-बजरंग सोनवणेंना हिंम्मत देण्यासाठी धनंजय मुंडे झाले कवी; सादर केली ‘ही’ कवीता
-सोनिया गांधी म्हणतात, राहुल दुरदृष्टी असलेला नेता…
-सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ
Comments are closed.