बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका, पुढे काय घडलं तर…- नितेश राणे

मुंबई | भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणेंची राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली होती. राणे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, मी त्या कार्यक्रमात उपस्थित असतो तर उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावली असती. यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे.

माझ्या कानावर आलेल्या माहितीनुसार, युवासेनेचे सदस्य आमच्या जुहूच्या निवासस्थानाबाहेर जमणार आहेत. यामुळे मुंबई पोलीसांनी एकतर शिवसेनेच्या सदस्यांना रोखावं अन्यथा पुढे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला आम्ही जबाबदार नाहीत. सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करू नका. आम्ही तुमची वाट बघतोय, असं म्हणत नितेश राणेंनी शिवसेनेला डिवचलं आहे. नितेश राणेंना या संदर्भात ट्विट केलं आहे.

नारायण राणे यांच्या टीकेमुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. राणेंच्या या वक्तव्याविरूद्ध शिवसेनेकडून कायद्याचा वापर करून पोलिसांत गुन्ह्याची नोंद केली आहे.

दरम्यान, नारायण राणेंवर राज्यातील विवीध शहरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आज सकाळी नाशिक पोलीस नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूनच्या दिशेने रवाना झाले आहेत. राणेंना अटक होते का? यावर सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“भान हरवलेल्या नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरतीकरुन शॉक दिला पाहिजे”

“…म्हणून मुस्लिमांसाठी भारत सर्वात सुरक्षित देश”

“उद्धव ठाकरेंविरूद्ध अपशब्द वापरणाऱ्यांचे हात छाटण्याची शिवसेनेत धमक”

नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश, मुख्यमंत्र्यांविरोधातील वक्तव्यानंतर राज्यभरात गुन्हे दाखल

‘कुठल्याही किंमतीत गुडघे टेकणार नाही’; पंजशीरमध्ये अहमद मसुदची तालिबान्यांना तगडी टक्कर

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More