बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाची लस घेणाऱ्यांना डॉक्टरांच्या महत्त्वाच्या सूचना, प्रत्येकानं जरुर वाचा

मुंबई |  महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रभाव अजूनही वाढताच असल्याचं पहायला मिळत आहे. मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये कोरोनाचं थैमान सुरु असून सरकारनं तातडीनं पावलं उचलत कठोर निर्बंध लावले आहेत. लॉकडाऊनला लोकांचा असलेला विरोध लक्षात घेता, सध्या राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र कोरोनाचा प्रभाव असाच वाढत राहिला तर राज्यात लॉकडाऊन देखील लावला जाऊ शकतो, असा अंदाज आहे.

दुसरीकडे कोरोना लसीचे डोस देण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. पहिल्यांदा कोरोना योद्ध्यांनाच लस दिली जात होती, त्यानंतर ती ६० वर्षांपुढील लोकांना तसेच दुर्धर आजार असणाऱ्या लोकांना देण्यात आली. सध्या ४५ वर्षापुढील लोकांसाठी कोरोना लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात सरकारी आरोग्य केंद्रांमार्फत ही लस दिली जात आहे.

Photo Courtesy – Pexels

लसीकरण जोरात सुरु असलं तरी केंद्रानं महाराष्ट्रावर अन्याय केल्याची भूमिका नुकतीच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मांडली. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला कमी डोस दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव अधिक आहे, त्यामुळे महाराष्ट्राला कोरोनाचे अधिक डोस मिळावेत, अशी राज्य सरकारची भूमिका आहे.

दरम्यान, केंद्राकडून लस पुरवठा झाला नाही तर येत्या काही दिवसात लसीकरण बंद करावं लागेल, असंही राज्य सरकारनं सांगितलं आहे. मात्र सध्या तरी लसीकरण सुरु असून केंद्राकडून व्यवस्थित पुरवठा झाल्यास लसीकरणासाठी असलेली वयाची अट आणखी शिथील केली जाऊ शकते, त्यामुळे अधिक नागरिकांना लसीकरणाचा फायदा घेता येऊ शकतो. मात्र लसीकरणाला जाण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

Photo Credit- Pixabay

वेदनाशामक गोळ्यांचा वापर टाळा-

अनेकजण वेदनाशामक गोळ्या घेत असतात. यामध्ये डोकेदुखी, अंगदुखी यासारख्या गोळ्यांचा समावेश होतो. कोरोनाची लस घेण्याच्या २४ तास अगोदरपर्यंत कुठलीही वेदनाशामक गोळी घेऊ नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. गोळ्याच नव्हे तर कोणतंही वेदनाशामक औषध घेऊ नये. तसेच लस घेतल्यानंतर देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानेच अशा प्रकारची औषधं घ्यावीत.

Photo Courtesy- Pixabay

मद्याप्राशन करणं टाळा-

अनेकांना दररोज मद्यप्राशन करण्याची सवय असते. कोरोनाची लस घेण्याआधी मद्यप्राशन शंभर टक्के टाळायला हवं. मद्यप्राशन केल्याने हँगओव्हर होऊ शकतो, तसेच डिहायड्रेशन देखील होऊ शकतं. कोरोनाची लस घेतल्यानंतर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कोरोनाची लस घेण्यासाठी मद्यप्राशन करणं टाळायला हवं.

Photo courtesy- Pixabay

रात्रीचं जागरण करु नका-

अनेकांना रात्री उशिरापर्यंत जागं राहण्याची सवय असते. सध्या वर्क फ्रॉम होम असल्याने दिवसा वेळ मिळत नाही, त्यामुळे रात्री अपरात्री जाऊन फिल्म, सिरीअल्स किंवा वेबसीरीज पाहण्याचं वेड अनेकांना असतं. दुसरीकडे मोबाईलच्या आहारी गेल्यानंही अनेकांचं रात्रीचं जागरण होत असतं. मात्र तुम्ही जर कोरोनाची लस घेण्यास जात असाल तर आदल्या रात्री जागरण नक्की टाळा. तुमची झोप चांगली झाली तर कोरोनाची लस चांगली साथ देते.

Photo Courtesy- Twitter/ Murlidhar Mohol

दुसरी लस घेणं टाळा-

कोरोनाची लस घेण्याआधी काळी काळजी घेण्यासारख्या गोष्टींमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोनाची लस घेण्यासाठी इतर कुठलीही लस घेणं काही दिवस आधी तरी टाळा. कारण त्यामुळे काही साईड इफेक्ट होऊ शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने याबाबतचा निर्णय घ्या. तसेच लस घेतल्यानंतरही दुसरी लस घ्यायची असेल तर तीही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या.

Photo Courtesy- Pixabay

लस टोचल्यानंतर लगेच बाहेर पडू नका-

कोरोनाची लस टोचून घेतल्यानंतर गडबड गोंधळ करु नका, तसेच तिथून लगेच बाहेर पडण्याचा प्रयत्न करु नका. लस घेतल्यानंतर तुम्हाला काही त्रास होतो का?, यासाठी १५ ते २० मिनिटं लस केंद्रावरच थांबण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे तेवढा वेळ तिथंच थांबा आणि आपल्याला काही त्रास तर होत नाही ना याचं निरीक्षण करा.

Photo Courtesy – Pixabay

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यातील कोरोना बेड्स आणि व्हेंटिलेटरची आकडेवारी जाणुन घ्या एका क्लिकवर

एड्स मुक्तीच्या दिशेनं पहिलं पाऊल, समोर आली आनंदाची बातमी!

‘…तेव्हा कल्याण पण मला म्हणाला असता, दादा तुम्हीही 2 दिवस इकडे नव्हता’; शपथविधीवरुन अजित पवारांची फटकेबाजी

“फडणवीसांनी कोणत्या जिल्ह्यात लसींचा साठा सर्वाधिक आहे ते दाखवून द्यावं”; जयंत पाटलांचा पलटवार

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार; नितीन गडकरींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More