बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना रुग्णांना हे इंजेक्शन देऊ नका, WHOनं भारताला दिला महत्त्वाचा सल्ला

नवी दिल्ली | संपूर्ण देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. वाढती कोरोना रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याचे चित्र संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे. त्यातच लसीकरण मोहीम आणि कोरोनावरील उपचार यामध्ये दररोज वेगवेगळी संशोधनं केली जात आहेत

अनेक लसींबाबत संशोधकांना सकारात्मक परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे. अशाच एका औषधाला भारतात परवानगी देण्यात आली होती. ते औषध म्हणजे आयव्हरमेक्टिन. या औषधाला गोव्यात रुग्णावर उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. पण लगेच जागतिक आरोग्य संघटनेनं या औषधाबाबत भारताला सावधगिरीचा इशारा दिला आहे.

या औषधाचा वापर रुग्णांवर करू नये. तसेच फक्त वैद्यकीय चाचण्या करण्यासाठीच करण्यात यावा, असं जागतिक आरोग्य संघटनेने भारताला म्हटलं आहे. तसेच त्याच्या उपयुक्ततेबाबत पुरेशी माहिती जोपर्यंत मिळत नाही. तोपर्यंत रुग्णांवर उपचारासाठी त्याचा वापर करण्यात येऊ नये, असं सुचवलं आहे.

हे औषध तोंडावाटे घेण्याचं आहे. तसेच नियमित वापर केला तर कोरोनाचा धोका कमी होऊ शकतो. अशा प्रकारे एका अमेरिकन नियतकालिकात दावा करण्यात आला होता. आयव्हरमेक्टिनमुळे होणारे परिणाम तसेच निष्कर्षाविषयी अभ्यास करण्याची प्रक्रिया सध्या शास्त्रज्ञांकडून सुरू आहे. तसेच या औषधाची काळजीपूर्वक तपासणी देखील केली जात आहे. त्यामुळे सध्या तरी या औषधाचा वापर भारतात करू नये असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या –

दूरदृष्टी! कोविडकाळात व्हायरल होतोय अटल बिहारी वाजपेयींचा ‘हा’ व्हिडीओ

कोरोनावर प्रभावी औषध शोधल्याचा दावा, महाराष्ट्रातील सांगलीत उत्पादन सुरु

“पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राला महिन्याला 29 कोटी डोस देणार”

क्वारंटाईन संपलेल्या आजोबांना आणायला गेले नातेवाईक, समोर आला अत्यंत धक्कादायक प्रकार

‘सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं’; गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More