बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

घाईघाईने निर्बंध शिथिल करु नका; ‘या’ 7 जिल्ह्यांमुळे मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

मुंबई | दुस-या लाटेनंतर आता राज्यावर डेल्टा प्लसचं संकट घोंगावू लागलंय. त्यामुळे राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनं सरकारी स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच घाईनं निर्बंध शिथिल करु नका, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यानं टप्प्याटप्प्यानं लॉकडाऊन हटवला जात आहे. पण अनलॉकच्या या टप्प्यात 7 जिल्ह्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या 7 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आज ऑनलाईन बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील या बैठकीला उपस्थित होते.

दुसऱ्या लाटेचे शेपूट अजून बाकी आहे. आपण पूर्णपणे त्यातून बाहेर आलेलो नाही. जिल्ह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळ्या ठरवल्या असल्या तरी स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आणि कुठलाही धोका न पत्करता निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे, असं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं.

दरम्यान, या सातही जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल. प्रसंगी अधिक कडक निर्बंधही लावावे लागणार आहेत, असं कोविड टास्क फोर्सचे डॉ संजय ओक आणि डॉ शशांक जोशी यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात आज फक्त 7 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर एकही मृत्यू नाही

“काँग्रेसने ‘ते’ काम केलं म्हणून एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला”

‘या’ दिवशी लाॅन्च होणार गुगल आणि जीयोचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन

महाराष्ट्रातील एकमेव आमदार! कोरोना काळात केलेल्या कामामुळे निलेश लंकेंचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’ ने सन्मान

आठ वर्षीय चिमुकलीनं स्वर्गाचा पत्ता टाकत लिहिलं दिवंगत वडिलांना पत्र!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More