३ मिनिटांपेक्षा जास्त वेळ रांगेत थांबाल तर टोल देऊ नका!

मुंबई | ३ मिनिटांपेक्षा जास्त वेळ टोलच्या रांगेत थांबावं लागलं तर टोल भरण्याची गरज नाही. अॅड. हिरओम जिंदाल यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकारातून ही माहिती समोर आलीय. 

जुलै २०१६ मध्ये त्यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे माहिती अधिकारांतर्गत अर्ज केला होता. या अर्जाला प्राधिकरणाने २९ ऑगस्ट २०१६ रोजी पाठवलेल्या उत्तरात ही बाब समोर आलीय. 

दरम्यान, टोल देऊनही जर प्रवाशांना कुठल्याही गैरसोयीचा सामना कारावा लागला असेल तर त्यासाठी ते ग्राहक न्यायालयात दाद मागू शकतात.

 

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…