पुणे महाराष्ट्र

“आरोग्याची हमी मिळत नसेल तर कोणीही जीव धोक्यात घालणार नाही…”

पुणे |  ऊसतोडणी कामगारांचा ५ लाख रूपयांचा विमा काढल्याशिवाय एकही कामगार घर सोडून बाहेर पडणार नाही असा इशारा ऊसतोडणी कामगार संघटनांनी सरकारला दिला.

कामगारांच्या प्रमुख ८ संघटनाची सोमवारी बीडमध्ये बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. या प्रमुख मागणीसह अन्य ११ मागण्यांचे निवेदन राज्य सरकार,साखर संघ व साखर आयुक्त कार्यालयाला पाठवण्यात आले आहे.

६ लाख इतक्या मोठ्या संख्येने कामासाठी म्हणून घराबाहेरच नव्हे तर गाव सोडून बाहेर पडणाऱ्या गरीब कामगारांच्या आरोग्य सुरक्षेची हमी मिळालीच पाहिजे यावर बैठकीत एकमत झाले, अशी माहिती गहिनीनाथ थोरे व जीवन राठोड यांनी दिली.

सरकारने जिल्हाधिकाºयांना त्यांच्या क्षेत्रात उसतोडणीसाठी येणाºया कामगारांना सहा महिने पुरेल इतके धान्य, तेल, मीठ, मिरची देण्याचा आदेश द्यावा, कारखान्यांवर कामगारांना मास्क, सॅनिटायझर देण्याची सक्ती करावी या मागण्या निश्चित करण्यात आल्या. त्या मुख्यमंत्री, साखर आयुक्त कार्यालय तसेच साखर संघाला पाठवण्यात आल्या, असं थोरे यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

‘आग्र्यातल्या याच दरबारातील अपमानाचा बदला घेवून महाराजांनी…’; उदयनराजेंनी मानले आदित्यनाथ यांचे आभार

“ड्रग माफियांची माहिती न देताच ड्रामा क्वीन का परत गेली?”

‘विधी’च्या चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचं पुनर्विलोकन करा- सुनील गव्हाणे

‘अचानक अभिषेक फासावर लटकल्याचा दिसला तर…’; कंगणा राणावतचं जया बच्चन यांना प्रत्युत्तर

व्यापाऱ्याला मोठं न करता शेतकरी हिताचा निर्णय घ्या- शरद पवार

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या