पोलिसांनी कारवाई करताना डावं-उजवं बघू नये, मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना थेट आदेश

मुंबई | कारवाई करताना पोलिसांनी डावे-उजवे बघू नये. त्यांच्यावर थेट कारवाई करावी, गुन्हेगारांवर थेट कारवाई करणं हेच पोलिसांचं कर्तव्य आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कडवे हिंदुत्ववादी साधक असलेल्या संघटनांविरोधात सुरू केलेल्या पोलिस कारवाईचे त्यांनी कौतुक केले. तसंच गुन्हेसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी पोलिस दलाने प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, महाराष्ट्रात पहिल्यांदाच अतिरेकी डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या संस्थावर एकाच वेळी कारवाई सुरू असल्याने मुख्यमंत्र्याचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-ते तसे नाहीत… अटक केलेल्यांपैकी मी काहींना ओळखतो- शरद पवार

-शिवस्मारकाबाबत 4 आठवड्यांत स्पष्टीकरण द्या; उच्च न्यायालयाचे आदेश

-विष पेरण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू नका- नरेंद्र मोदी

-अपशब्द वापरल्यामुळे मराठा समाज आमदार विजय औटींविरोधात आक्रमक!

-विराटने क्रिकेटमधील ‘हा’ प्रकार खेळण्यास दिला नकार

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या