मुंबई | प्रेमावरचं तर सगळं जग चालतं, प्रेम आहे तर सगळं काही आहे, युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं, प्रेमाला काही वय, मर्यादा नसते, असे प्रेमाबाबतचे अनेक डायलॉग तुम्ही ऐकले असतील. पण प्रेमात काही चुका टाळाव्यातच. याबाबत प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांनी तरुणींना एक चांगला सल्ला दिला आहे.
लग्न झालेल्या पुरुषावर कधीच प्रेम करु नका. मी यामुळे खूप त्रास सहन केला आहे, असा नीना गुप्ता यांनी तरुणींना सल्ला दिला आहे. उत्तराखंडच्या मुक्तेश्वरमध्ये नीना गुप्ता यांनी एक व्हिडीओ शूट केला आहे. त्यांनी हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमात पडल्यावर तुम्ही त्याला लपून छपून भेटता. सुट्टीला फिरायलाही जाता. अनेक रात्री तुम्ही त्याच्यासोबत घालवता. त्यानंतर तुम्हाला त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा होते, अशी सगळी परिस्थिती नीना गुप्ता यांनी सांगितली आहे.
दरम्यान, अनेक तरुणी विवाहित पुरुषाला त्याच्या पत्नीपासून घटस्फोट घ्यायला सांगतात. ब्लॅकमेल करतात. घटस्फोट घेणं तसं सोपं नसतं. या सगळ्या परिस्थितीत तरुणी त्याला सोडण्याचा विचार करतात. मी हे सगळं केलंय. मला खूप त्रास सहन करावा लागलाय. त्यामुळे मुलींनो तुम्ही असं करु नका, असा सल्ला नीना गुप्तांनी दिला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
CAA ला विरोध करणाऱ्या ‘या’ भाजप नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
आरोग्य सुविधांवर खर्च होऊनही कुपोषणाने मुले दगावतात कशी? – डॉ. अभय बंग
महत्वाच्या बातम्या-
भाजपचं वर्तन हे कोरोना व्हायरसपेक्षाही भयानक- अशोक चव्हाण
…म्हणून मोदींनी यंदा होळी साजरी न करण्याचा घेतला निर्णय
रात्री वडिलांचं निधन, सकाळी दहावीचा पेपर देऊन मुलाने केले वडिलांवर अंत्यसंस्कार!
Comments are closed.