Top News

फडणवीस यांच्या विरोधात वैयक्तीक घोषणा नको; अजित पवारांची मोर्चेकऱ्यांना ताकीद

बारामती | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात वैयक्तीक घोषणाबाजी करू नका, अशी ताकीद राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी दिली. ते बारामतीत ठिय्या आंदोलनात बोलत होते.

मराठा मोर्चेकऱ्यांच्यावतीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. त्या आंदोलनाला चक्क अजित पवारांनी हजेरी लावली. तेव्हा काही कार्यकर्ते फडणवीसांविरोधात घोषणाबाजी करू लागले. तेव्हा अजित पवारांनी त्यांना वैयक्तीक फडणवीसांवर घोषणा देऊ नका, असं सांगितलं.

दरम्यान, शरद पवारांच्या घरासमोरील आंदोलनात अजित पवार आल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. मात्र त्यांनी आंदोलकांच्या मांडीला मांडी लावून एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, अशा घोषणा दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठ्यांना दंड आकारा; उच्च न्यायालयात याचिका दाखल

-आता कामकाज पाहण्यासाठी आदित्य ठाकरे संसदेत…

औरंगाबादमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; रस्त्यावर पेटवले टायर

-…म्हणुन सनी लिओनी मागतेय आर्थिक मदत

-मराठा मोर्चेकऱ्यांची माणुसकी; रास्तारोकोत अडकलेल्यांना भरवला घास

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या