Top News कोरोना देश

कोरोनाबाधित रुग्णाच्या घराबाहेर पोस्टर्स लावू नका- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली | घरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळला की त्या घराबाहेर सध्या पोस्टर लावण्यात येतात. मात्र आता रूग्णांच्या घराबाहेर पोस्टर लावण्याच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना निर्देश दिलेत.

कोरोनाबाधित रुग्णाच्या घराबाहेर त्यासंदर्भातील पोस्टर्स लावणं गरजेचं नसल्याचं, सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलंय.

केंद्र सरकारने आपल्या नियमावलीत कोरोना रुग्णाच्या घरावर पोस्टर लावण्याबाबत उल्लेख केलेला नाही. परंतु, आपत्ती निवारण अधिनियमांतर्गत विशिष्ट प्रकरणातच अधिकाऱ्यांमार्फत कोरोना रुग्णांच्या घरासमोर सूचना लावली जाऊ शकते, असंही न्यायालयाने नमूद केलंय.

कोरोना रुग्णाच्या घरावर पोस्टर्स लावण्याचा प्रकार बंद करण्यासाठी देशव्यापी दिशानिर्देश जारी करण्याच्या मागणीसंदर्भातील याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायालयाने आदेश दिलेत.

थोडक्यात बातम्या-

कोरोनानंतर भारतात आलाय रहस्यमय आजार; आकडी येऊन बेशुद्ध पडत आहेत लोक

‘राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथी मधला फरक तरी माहित आहे का?’; मुख्यमंत्र्यांची टीका

कोथरुडच्या सोसायटीत शिरला गवा; गवगवा झाल्यावर पुणेकरांची तोबा गर्दी!

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीची हॉटेलच्या रूममध्ये आत्महत्या

“…फुसकुली सोडून भाजपने स्वतःचीच अक्कल दिवाळखोरी जाहीर केली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या