Top News

मराठ्यांच्या भावनांशी खेळू नका, झेपत नसेल तर सत्ता सोडा; राज ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई | मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने लोकांच्या भावनांशी खेळत न बसता लवकर भूमिका घ्यावी आणि ते जर झेपत नसेल तर पायउतार व्हावं, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

सरकारला तुमचा जीव प्यारा नाही. सरकारला मग ते आधीचे असो की आत्ताचे, फक्त तुमची मतं हवी आहेत. वास्तविक मराठा समाजाने इतके मोर्चे काढल्यावर सरकारनं तत्परतेनं भूमिका घ्यायला पाहिजे होती, असंही ते म्हणाले.

दरम्यान, सरकारनं वस्तुस्थिती स्वच्छपणे समोर ठेवावी. आरक्षण दिल्यावर खरंच किती रोजगार सरकारी क्षेत्रात मिळणार आहे? किती जागा शिक्षण क्षेत्रात उपलब्ध होणार आहेत? हेही सागावं असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत

-टीकाकारांना चोख प्रत्युत्तर; विधानसभा अध्यक्षांच्या दालनात दिला राजीनामा

-मराठा आंदोलनात अज्ञात आंदोलकांनी पेटवली एसटी

-शरद पवार मराठा आरक्षणाच्या बाजूनं किती दिवस राहतील? खात्री देता येत नाही!

-मराठा आरक्षणासाठी छावा संघटनेच्या जिल्हा प्रमुखाचा आत्मदहनाचा प्रयत्न

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या