बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोना लसीचे डोस मिक्स घेऊ नका’ ; WHO चा गंभीर इशारा

नवी दिल्ली | जानेवारीपासून देशभरात लसीकरण चालू करण्यात आलं आहे. या लसीकरणाचा सध्या चौथा टप्पा चालू आहे. भारतातील लोकसंख्येमुळे सध्या लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे अनेक जण लसीच्या प्रतिक्षेत आहेत. तर काही जणांना पहिला डोस मिळाला असला तरी दुसऱ्या डोससाठी धडपड करावी लागत आहे. त्यामुळे लोक घाईघाईने निर्णय घेतात. तर काही जण दोन डोस दरम्यान दोन वेगवेगळ्या कंपन्याचे डोस घेण्याची शक्यता असते. याच मुद्यावर आता WHOनं महत्वाचा सल्ला दिला आहे.

काही देशांमध्ये ‘मिक्स अँड मॅच’ कोरोना लसीचा डोस देण्याचा प्रयोग सुरू आहे. तसेच अनेक वैज्ञानिकांनी मिक्स अँड मॅच लसीचे डोस सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे. पण आता जागतिक आरोग्य संघटनेने मिक्स अँड मॅच लसीचे डोस धोकादायक ठरू शकतात, असा इशारा दिलाय. कोरोना लसीचे मिक्स डोस घेऊ नका, हे धोकादायक ठरू शकते, असा इशारा WHOच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी दिला आहे.

अजूनपर्यंत ‘मिक्स अँड मॅच’ कोरोना लसीचा डोस याविषयी कोणताही डेटा उपलब्ध झाला नाही. दरम्यान, वेळेवर लसीचे डोस घेणे खूप गरजेचे आहे. जर वेगवेगळ्या देशातील लोकांनी आपल्या मर्जीनुसार दुसरा आणि तिसरा डोस केव्हा घेतला तर यामुळे समस्या निर्माण होऊ शकते, असंही सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या. काही लसी त्यांच्यासाठी कमी सुरक्षित किंवा कमी योग्य असल्यानं त्याचे साईडइफेक्ट होऊ शकतात.

दरम्यान,दोन वेगवेगळ्या लसींचे डोस कोणत्याही परिस्थितीत एकत्र मिसळले जाऊ नयेत, असं तज्ज्ञ डाॅक्टरांनी सांगितलं आहे. सर्व लसी वेगवेगळ्या प्रकारे बनवल्या जातात, ज्या काम देखील वेगवेगळ्या प्रकारेच करतात. म्हणून अशा वेळी दोन वेगवेगळे डोस एकत्र करणं चांगलं ठरू शकत नाही, असा सल्ला भारतीय डाॅक्टरांनी याआधी दिला होता.

थोडक्यात बातम्या-

“संजय राठोडांना विरोध केला तर परिणाम भोगावे लागतील”

परभणीत 24 तासात 232 मिमी पावसाची झाली नोंद; 233 मेंढ्या गेल्या वाहून

अर्धांगवायूचा झटका आला नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका – अमोल मिटकरी

12 ते 18 वयोगटातील मुलांना मिळणार कोरोना लस; नोंदणीला झाली सुरुवात

कोरोना झाल्यानंतर पडतंय टक्कल? वाचा लाँग कोविडचे साईडइफेक्ट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More