महाराष्ट्र मुंबई

काँग्रेस संपली असं समजू नका, अशोक चव्हाणांचा राष्ट्रवादी, शेकापला इशारा

मुंबई | काँग्रेस आता संपली आहे, त्यामुळे तिला भाव देण्याची गरज नाही, अशा भ्रमात कधीही राहू नका, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाला दिला आहे.

काँग्रेसप्रणित महाआघाडीतील राष्ट्रवादी आणि शेकाप पडद्याआडून नारायण राणेंच्या स्वाभिमाणी पक्षाशी हातमिळवणी करण्याच्या प्रयत्नात आहे. यासंदर्भात चव्हाण यांनी नाव न घेता ही टिका केली आहे.

कोकणावर कुणाची मक्तेदारी नाही. पक्ष अडचणीत येईल अशी कोणतीही तडजोड मित्रपक्षांशीदेखील करणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेसची संघर्ष यात्रा सध्या कोकणातील रायगड जिल्ह्यात सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या-

-चांगली खेळी करुनही ‘हिटमॅन’च्या पदरी निराशा, इतक्या धावांनी शतक हुकलं

-हे तर मनुवादी सनातन्यांचे मुकुटमणी- जितेंद्र आव्हाड

-स्वतंत्रते न’बघवते!; राज ठाकरेंचा पुन्हा मोदी-शहा जोडीवर हल्लाबोल

-युवराज सिंगची जबरदस्त खेळी, मुंबई इंडियन्स म्हणते…, पाहा व्हीडिओ-

-संघाचा देशातील सर्व यंत्रणांवर नियंत्रण मिळवण्याचा डाव- राहुल गांधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या