बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘दुपारी 3 ते सायंकाळी 7 पर्यंत शेतात काम करु नका’; ‘या’ जिल्ह्याच्या प्रशासनाने दिले आदेश

लातूर | हवामान खात्याने पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे लातूरच्या जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी दुपारी 3 ते सायंकाळी 7 या कालावधीमध्ये शेतात काम करू नये, कारण विजा पडण्याची शक्यता आहे, असं जिल्हा प्रशासनाने सांगितलं आहे.

जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी खबरदारी घ्यावी. पावसाची परिस्थिती असताना बाहेर जाणं टाळावं. दुपारी 3 ते 7 या कालावधीमध्ये वीज पडण्याची दाट शक्यता असते. यामुळे या वेळेत दुभती जनावरे पाण्याच्या स्त्रोतांजवळ, झाडाजवळ किंवा विजेच्या खांबाजवळ बांधू नयेत, असं आवाहन लातूर जिल्हा प्रशासनाने केलं आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी हालवून स्वत: देखील सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असं देखील लातूर जिल्हा प्रशासनाने सांगितलं आहे. तसेच मांजरा नदीकाठच्या नागरीकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, मांजरा प्रकल्पात सातत्याने पावसाची संततधार चालू आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. पाऊस असाच चालू राहिल्यास पूर येण्याची शक्यता आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“अजितदादा, मुख्यमंत्र्यांसोबत प्रस्ताव बनवा, नरीमन पॉईंट ते दिल्ली 12 तासात जोडतो”

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! महिला पोलिसांच्या ड्यूटीच्या तासांमध्ये केला मोठा बदल

“मित्र मित्राला मिठी मारणार नाही तर कुणाला मिठी मारणार?”

#सोयाबीन! आपल्याकडे बाकी सगळं ट्रेंड होत पण शेतकऱ्यांच्या व्यथा नाही- हेमंत ढोमे

“एक दिवस सगळे संघ पाकिस्तानात खेळायला येतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More