महाराष्ट्र मुंबई

“ओबीसी आरक्षणाबाबत सरकारनं गांभीर्याने कार्यवाही करावी”

मुंबई | ओबीसी आरक्षणाबाबत सरकारने गंभारपणे कार्यवाही करावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. भुजबळ यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 

ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली तर राज्यात मोठा उद्रेक होईल. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. सरकारने याबाबत गंभीरपणे विचार करावा, असं भुजबळ यांनी म्हंटलं आहे.

सर्वोच्च न्यायलयाच्या 9 न्यायाधिशांच्या खंडपीठाने ओबीसी आरक्षण मान्य केलं आहे, या बाबी उच्च न्यायालयासमोर मांडण्याची आवश्यकता आहे, असं भुजबळ यांचं म्हणणं आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ओबीसी आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती.

महत्वाच्या बातम्या-

ऐका मोहम्मद शमीचं इंग्लिश… ऐकून तुम्हीही हसाल!

-…आणि अजित पवारांसमोरच भिडले राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक

-2009 सारखचं राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला दणदणीत यश मिळेल! 

मुंबई बंद पाडणारा लढवय्या माणूस ‘जाॅर्ज फर्नांडीस’ काळाच्या पडद्याआड

-जे आमच्यासोबत येतील त्यांच्यासोबत, नाही तर त्यांच्याशिवाय- मुख्यमंत्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या