बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आरएसएसवाले देशाचे मालक आहेत का, टॅक्स का भरत नाहीत?”

नवी दिल्ली | राम मंदिर जमीन खरेदीच्या वादावरून देशातील राजकारण तापलेलं दिसत आहे. याचाच धागा पकडत काँग्रेसने आरएसएसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी राजकारणाचा मोठा भाग असूनही स्वयंसेवक संघाची नोंदणी का झालेली नाही, असा सवाल केला आहे.

काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी राजकारणाचा मोठा भाग असूनही स्वयंसेवक संघाची नोंदणी का झालेली नाही?, ही संघटना इन्कम टॅक्स का भरत नाही?, ते या देशाचे मालक आहेत का?, असा सवालही पवन खेडा यांनी केला आहे. त्यासोबतच गेल्या तीन पीढ्यांना मूर्ख बनवण्याचे काम संघवाले करत आहेत. मात्र सुदैवाने त्यांना यात यश आलेलं नाही कारण या तीनही पिढ्या हुशार असल्याचं पवन खेडा म्हणाले.

राजस्थानमध्ये एका खासगी कंपनीला नगरपालिकेकडून थकबाकी मिळवून देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचं कमिशन मागितल्याचा आरोप भाजप आणि आरएसएसच्या काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, सध्या राम मंदिराच्या जमीनीवरून महाराष्ट्रात वाद चालू असलेला पाहायला मिळत आहे. सेना-भाजपमध्ये यावरून जोरदार राडा झाल्याचं दिसून आलं. भाजप युवा मोर्चाने शिवसेना भवनावर मोर्चा काढला होता मात्र त्यावेळी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यावेळी सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये संंघर्ष पाहायला मिळाला.

थोडक्यात बातम्या-

35 हजार लसी पडुन असल्याने ‘या’ महापालिकेचा लसीकरण सर्वांना सक्तीचं करण्याचा विचार

“काँग्रेसला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर आम्ही उरलेले दोन पक्ष एकत्र राहू”

कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई-वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क – पुणे प्रशासन

‘या सगळ्यांचे गॉडफादर उद्धव ठाकरे’; प्रदीप शर्मांना अटक झाल्यावर भाजपची टीका

सरकारच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक केल्यास मासिक पेन्शनची हमी

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More