बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सावधान! गुगलवर ‘या’ 5 गोष्टी शोधाल तर थेट जेलमध्ये जाल

नवी दिल्ली | जगातील सर्वाधिक वापरलं जाणार सर्च इंजिन (Search Engine) म्हणून गुगलला (Google) ओळखण्यात येतं. आपल्याला काहीही जाणून घ्यायचं असेल तर आपण लागलीच गुगलवर सर्च करतो. परिणामी गुगल हा आपल्या दैनंदिन जिवनाचा भाग बनलं आहे. पण या संसाधनाचा जितका फायदा आहे, तितकाच तोटादेखील आहे. आपल्या देशात काही निवडक गोष्टींसाठी सर्च केलं तर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.

सरकार वेळोवेळी आपली आयटी वापराबाबतची नियमावली जाहीर करत असतं. यामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या सर्च केल्यावर गुगल वापरकर्त्यांना जेलमध्ये जावं लागण्याची शक्यता आहे. फिल्म पायरेसी हा सध्या वाढता प्रकार समोर आला आहे. गुगलच्या माध्यमातून जर फिल्म पायरेसी करत असाल तर आपणास जेल होवू शकते.

चाइल्ड पाॅर्न व्हिडीओ गुगलवर सर्च करण्यास किंवा व्हायरल करण्यास बंदी आहे. असा प्रकार करताना कोणी आढळलं तर त्याच्यावर कारवाई करण्यात येते. देश आणि सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाची असणारी बाॅम्ब बनवण्याची पद्धती पाहणं आणि सर्च करण गुन्हा आहे. गर्भपात करणे हा तर गुन्हा आहेच पण गर्भपात करण्याच्या पद्धती गुगलवर शोधणं हा सुद्धा मोठा गुन्हा आहे. खासगी फोटो आणि व्हिडिओ लीक करणे गंभीर गुन्हा आहे. यामुळे जेल देखील होऊ शकते

दरम्यान, महिला, बालके, देश, समाज, यांच्या सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञान हे दुहेरी हत्यार आहे. तंत्रज्ञानानं संकट संपवता ही येत आणि निर्माण करतादेखील येतं. पण संकटं सोडवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा म्हणून गुगलवर काही गोष्टी सर्च करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या 

“170 आमदारांच्या पाठिंब्याचा दावा पोकळ, ठाकरे सरकार कधीही अडचणीत येऊ शकतं”

‘तुम्ही 2 वर्ष काय झोपला होतात का?, दररोज नवीन…’, फडणवीस आक्रमक

“सरकारनं मिस्टर इंडियाचं घड्याळ घातलंय, उद्या अधिवेशनात 106 आमदार…”

दहावी बारावी परिक्षांचं वेळापत्रक जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

“सर्वात निष्क्रिय मंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची इतिसाहात नोंद होईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More