धकाधकीच्या जीवनात असा करा ब्रेन डिटॉक्स, ‘या’ समस्या होतील दूर

नवी दिल्ली | ब्रेन अर्थात मेंदू (Brain) आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. आपल्या शरीराचे नियंत्रण करण्याची जबाबदारी आपल्या मेंदूवर असतं. त्यामुळे आपल्या डोक्याची आणि मेंदूची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपला मेंदू वरचेवर डिटाॅक्स करणं गरजेचं आहे.

बाॅडी डिटाॅक्स, ब्लड डिटाॅक्स याबाबतीत आपण नेहमीच ऐकतो. तुम्हाला ब्रेन डिटाॅक्स (Brain Detox) बद्दल माहित आहे का? हो आपला मेंदू अर्थात ब्रेन डिटाॅक्स होऊ शकतो. यामुळे आपल्या मेंदूला चालना मिळण्यास मदत होते.

हल्ली या धावपळीच्या जगात वावरत असताना अनेक समस्या आपल्याला जाणवत असतात. थकवा, ब्रेन स्ट्रोक (brain stroke), डिप्रेशन यासारंख्या गोष्टी उद्भवतात. अशावेळी तुमच्या मानसिक आरोग्यासाठी तुमचा मेंदू डिटाॅक्स करणं गरजेचं आहे. ते करण्यासाठी या पद्धतीचा अबलंब करु शकता.

झोप घेणं सगळ्याच वयोगटातील लोकांसाठी गरजेचं आहे. डोकं शांत करण्यासाठी पुरेपुर झोप(sleep) घेणं गरजेचं आहे. आपल्या शरीराला दररोज किमान 6 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. ब्रेन डिटाॅक्स करण्यासाठी तुम्ही झोप घेत असाल तर या बाबी लक्षात ठेवा. खोलीत अंधार असावा, खोलीचं वातावरण थंड असावं, खोलीत शांतता असावी.

व्यायाम हा प्रकार देखील तुमचा मेंदू डिटाॅक्स करायला मदत करतो. काही व्यायाम तुमच्या ग्लिम्फॅटिक (glymphatic) क्रियकलापांना मदत करतात. व्यायामामुळे तणावमुक्त होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे निरोगी मनासाठी ब्रेन एक्सरसाइज खूप गरजेचं आहे.

मेंदू डिटाॅक्स करण्यासाठी, तुम्ही चांगला आहार पाळणं गरजेचं आहे. आपण खात असलेल्या गोष्टींचा तुमच्या झोपेवर परिणाम होत असेल तर अशावेळी योग्य आहार (Diet) पाळा. रात्री झोपण्यापूर्वी जड जेवण टाळा, मसालेपदार्थ खाणे टाळा. तुम्ही तुमच्या आहारात अथवा व्यायामात काही बदल करत असाल तर तुमच्या डाॅक्टरांच्या सल्ला घेऊनच करा.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More