बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ही’ गोष्ट करा तुम्हाला संचारबंदीचा त्रास होणार नाही, पोलिसांनीच दिला शब्द

पुणे | देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्रातील पुण्यात असल्याचं नुकतचं स्पष्ट झालं आहे. पुण्याची सध्याची कोरोनाची परिस्थिती ही अत्यंत गंभीर असून प्रशासनातर्फे संध्याकाळी 6 ते सकाळी 6 दरम्यान संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनातर्फे आदेश लागू केल्यानंतर त्यात अस्पष्टता असल्याचं दिसून आलं.

पुण्याबाहेरील गावावरून येणाऱ्या लोकांना संचारबंदीच्या काळात वाहन मिळेल का? किंवा जर त्यांना घरून नेण्यासाठी एखादी गाडी आली तर त्या गाडीला पोलीस अडवून संचारबंदीच्या उल्लंघनाची कारवाई करणार का? असे नानाविध प्रश्न या संचारबंदीबद्दल उपस्थित केले जात आहेत. यावर सह पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी पोलिसांची भूमिका स्पष्ट केली आहे.

पुण्यात लागू केलेली संचारबंदी ही कायदा आणि सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी नसून ही संचारबंदी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी असल्याचं शिसवे यांनी सांगितलं. तसेच पोलीस विभाग संचारबंदीच्या अंमलबजावणीकडे अधिक संवेदनशीलतेने पाहणार असून महापालिकेचा सुधारित आणि स्पष्ट आदेश येईपर्यंत संचारबंदीच्या नियमात शिथिलता असणार आहे. तसेच कोणाचीही विनाकारण अडवणूक करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्याबरोबरच विनाकारण फिरणाऱ्यांवर आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस कडक कारवाई करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

ऑफिसमधून काम संपवून घरी परतणाऱ्या लोकांना संचारबंदीच्या काळात पोलिसांकडून अडवणूक होणार नाही. पण त्यांच्याकडे वैध ओळखपत्र असणं गरजेचं आहे. कामावरून घरी परतणाऱ्या लोकांना अडवून पोलीस त्यांची चौकशी करणार नाहीत. बाहेर गावावरून जर कोणी येत असेल तर त्यांनी प्रवासाचे तिकीट जवळ बाळगणं गरजेचं आहे. वैद्यकीय कामांसाठी घराबाहेर पडल्यास संबंधित कागदपत्रं आणि रुग्णालयाचं पत्र जवळ असणं बंधनकारक आहे. हे सर्व जर तुमच्याकडे असेल तर पोलिस तुमच्यावर कोणतीही कारवाई संचारबंदीच्या काळात करणार नाहीत, असं स्वतः सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणताही संभ्रम बाळगण्याची आणि अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही.

थोडक्यात बातम्या

विठुरायाच्या दर्शनासाठी आता कोरोना टेस्ट बंधनकारक नाही!

झुम कॉल सुरू असतानाच बड्या राजकीय नेत्याची पत्नी आली नग्नावस्थेत, व्हिडीओ व्हायरल

एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिलासादायक

मोठी बातमी! महाराष्ट्रात लाॅकडाऊन अटळ; वृत्तपत्र संपादकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

दहावीच्या विद्यार्थिनीवर गॅंगरेप करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घातली गोळी!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More