मुंबई | भारतात व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. आता एक मेसेज फक्त 5 जणांना फॉरवर्ड करता येणार आहे. व्हॉट्सअॅपने आजपासून भारतात हा नियम लागू केला आहे.
फेक मेसेजेस फॉरवर्ड केल्यानं गदारोळ माजू शकतो, हे अलिकडच्या काळात दिसून आलं आहे. त्यामुळं ‘फेक मेसेजेस’ला आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपनं भारतातील वापरकर्त्यांवर निर्बंध घातले आहे. भारतात जवळपास 20 कोटी वापरकर्ते असून सगळ्यांना हे बंधन घालण्यात आलं आहे.
व्हॉट्सअॅपकडून वापरकर्त्यांना याबद्दल माहिती मिळावी यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसंच मेसेज फॉरवर्ड करताना विचार करूनच फॉरवर्ड करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या–
-फडणवीस यांच्या विरोधात वैयक्तीक घोषणा नको; अजित पवारांची मोर्चेकऱ्यांना ताकीद
-मराठ्यांना दंड आकारा; उच्च न्यायालयात याचिका दाखल
-आता कामकाज पाहण्यासाठी आदित्य ठाकरे संसदेत…
औरंगाबादमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; रस्त्यावर पेटवले टायर
-…म्हणुन सनी लिओनी मागतेय आर्थिक मदत