Kiss करण्याचे असेही फायदे; वाचून विश्वास बसणार नाही
नवी दिल्ली | प्रेम म्हणजे एक हळुवार अलगद वाऱ्याची मंद झुळूक होय. प्रेमाचा आधार मिळाला की माणूस जग जिंकू शकतो. त्याचप्रमाणे प्रेमात रुसवे-फुगवे देखील आलेच. हाच रुसवा-फुगवा काढण्यासाठी आपल्या प्रियसीला-प्रियकराला आपण चुंबन (kiss) करतो. तुम्हाला समजलं असेलच आज किस डे आहे. व्हेलटाईन वीकमधील एक महत्त्वाचा दिवस. या किसचे फायदे आपण जाणून घेऊयात.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण किस केल्यानं रोगप्रतिकारकशक्ती (immunity) वाढते. शरीरातील असंवेदनशीलता कमी होते. चुंबनाच्यावेळी जोडीदाराचा स्वॅब(Swab) तोंडात गेल्यानं आपल्या शरीरात जंतूविरुद्ध लढण्यासाठी अँटीबाॅडीज (Antibodies) तयार होतात. भविष्यात तुम्ही आजारी पडत नाही.
शरीरातील तणाव दूर करण्यासाठी देखील चुंबन मदत करते. चुंबन केल्यानं कोर्टिसोलची पातळी कमी होेते. तुम्ही जर कधी नोटीस केलं असेल तर चेहऱ्यावर हसू येतं. अशा स्थितीत तुम्ही तणाव, थकवा आणि इतर समस्यांपासून दूर होता. किस केल्यानं शरीरात आनंदी भावना निर्माण होते. चुंबन शरीरात ऑक्सिटोसिन(oxytocin), डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखी रसायनं सोडतं, जे तुमच्या भावना आणि बंध मजबूत करतात.
प्रेम हे तरुणपणात जास्त बहरुन येतं असं म्हणतात. याच प्रेमातील किस तुम्हाला दिर्घकाळ तरुण ठेवतं. यामुळं तुमचे ओठ,गाल,चेहरा,जीभ,जबडा आणि मानेच्या स्नायूंचा व्यायाम होतो. किसमुळं तुमचं रक्ताभिसरण(Circulation) सुधारतं. किस तुम्हाला निरोगी, सुंदर आणि मजबूत बनवतं.
अनेकदा आपण चेहऱ्याचा व्यायाम करतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे किस केल्यानं चेहऱ्याचे स्नायू मजबूत होतात. रोज किस केल्यास किसमध्ये 34 स्नायू आणि 112 आसनस्थ स्नायूंचा समावेश होतो. यामुळं चेहऱ्यावर सुरकुत्या(Wrinkles) पडण्याची समस्या होत नाही. त्यामुळं हे किसचे फायदे आपल्या जोडीदाराला नक्की सांगा.
महत्त्वाच्या बातम्या
Comments are closed.