बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताय का?”

मुंबई | पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला टेकल्या आहेत. वाढत्या इंधनाच्या दराला काँग्रेस पक्षाकडून सतत विरोध दर्शवला जात असतो. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई या ठिकाणी इंधन दरवाढ विरोधात सायकल रॅली काढण्यात आली आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं होतं. काँग्रेसची सायकल रॅली नौटंकी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. फडणवीसांच्या वक्तव्यावर नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काँग्रेसने सायकल रॅली काढली ही नौटंकी वाटत असेल तर सामान्य जनतेचं जगणं भाजपाच्या सरकारने मुश्कील केलं आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांना फटकारलं आहे. मुंबईमध्ये नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

भाजपमुळे हाल झालेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतायत का?, असा खोचक सवालही नाना पटोले यांनी फडणवीसांना केला आहे. महाराष्ट्रात 17 जूलैपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर काँग्रेस हे आंदोलन आणखी तीव्र करेल, असा इशाराही पटोलेंनी दिला.

तसेच इंधनाच्या वाढलेल्या किंमती कमी करण्यासाठी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत योग्य माहिती पुरवण्यासह महाराष्ट्राला जास्तीत जास्त लसी मिळाव्या यासाठी निवेदन दिलं असल्याचं सांगितलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमी असतानाही रोज पेट्रोल, डिझेल, सीएनजी सारख्या इंधनाचे दर वाढवण्याचे काम मुद्दाम करत आहेत. अशा वेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या आदेशावरुन संपूर्ण देशात आंदोलनं करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, मग घाबरताय का?’; फडणवीसांचा महाविकास आघाडीला सवाल

चिंता वाढली! देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, पण मृतांच्या संख्येत घट 

“तुमचे आवडते मुख्यमंत्री पाचव्या नंबरवर आहेत हे विसरु नका”

‘इसमे गलत क्या है?’; पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला ‘या’ काँग्रेस नेत्याचा पाठिंबा

‘जबरदस्त काम करतायत मुख्यमंत्री’; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून योगींचं कौतुक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More