बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सुप्रिया ताई जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा का?”

मुंबई | राज्याची राजधानी असलेल्या मुंबईसह संपूर्ण राज्यात सध्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. राज्यात मागील काळात भाजपची सत्ता असताना देखील परिस्थिती जैसे थे होती. भाजप सरकारच्या काळात विरोधी पक्षात असलेल्या पक्षांनी सरकारला याच खड्ड्यांवरून धारेवर धरलं होतं. पण, आता विरोधी बाकावर असलेल्या भाजपसह मनसेनं महाविकास आघाडी सरकारवर आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मागील सरकारच्या काळात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून सेल्फी विथ खड्डा मोहीम राबवली होती. त्यांच्या या मोहीमेस पक्षांतील नेत्यांनी प्रतिसाद देत, खड्ड्यांवरून भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. आता राज्यातील आणि मुंबईतील खड्ड्यांवरून मनसे प्रवक्ते संदीप देशपांडेंनी सुप्रिया सुळेंना त्यांच्या सेल्फी विथ खड्डा मोहीमेची आठवण करून दिली आहे. ताई जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा का? असा सवाल करत सुप्रिया सुुळेंचा फोटो देशपांडेंनी ट्विटरवर शेअर केला आहे.

आज सकाळी राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर आणि सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र सोडलं आहे. सुप्रियाताई आता सेल्फी विथ खड्डा कार्यक्रम कुठं गेला?, असा सवाल शेलार यांनी सुप्रिया सुळेंना केला आहे.

दरम्यान, मुंबईतील खड्ड्यांच्या प्रश्नांवरून रेडिओ जॉकी असलेल्या मलिष्काने देखील आवाज उठवला आहे. मलिष्कानं खड्याच्या बाजूला बसत बाॅलिवूडच्या जुन्या गाण्याचा संदर्भ घेत सरकारवर उपरोधीक टीका केली आहे.

वाचा ट्विट –

थोडक्यात बातम्या –

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ कायम; वाचा आजची आकडेवारी

कडक सॅल्यूट! एकही सुट्टी न घेता 8 महिन्यात केलं तब्बल 61 हजार जणांचं लसीकरण

“सरकारने एकदा निर्णय घेतला की समाधानीच राहायचं असतं”

“राज ठाकरेंनी मागणी करून काही मोठं काम केलं नाही”

मद्यप्रेमींचा हिरमुड! ‘या’ ठिकाणी तब्बल 45 दिवस दारूची दुकानं बंद राहणार

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More