बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘वर्क फाॅम होम’ करताय? तर ‘ही’ गोष्ट केलीच पाहिजे

मुंबई | दीड वर्षापूर्वी कोरोनामुळे सर्वकाही ठप्प झालं. त्याचा अनेक क्षेत्राला मोठा फटका बसला. मात्र, आयटी सेक्टरने या काळात वेगळी उंची गाठली. कोरोना काळात अनेकांनी वर्क फाॅम होम केलं. त्यामुळे अनेकांना डोळ्याच्या, पाठीच्या समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. आता कोरोना कमी झाल्यानं अनेकांचे ऑफिस सुरू झाले आहेत. परंतु, अजूनही काहींनी घरून काम करणं पसंत केलं आहे. त्यांच्यासाठी तज्ज्ञांनी काही विषेश सल्ले दिले आहेत.

अनेकजण दिवसातून अनेक तास लॅपटाॅप, मोबाईल आणि काॅम्प्यूटरसमोर बसलेले असतात. त्यामुळे अस्पष्ट दृष्टी होणे, डोकेदुखीची समस्या, डोळे कोरडे होणे, डोळ्यांचा ताण आणि डोळ्यांचा थकवा यांसारख्या समस्या उद्भवलेल्या दिसतात. त्यामुळे तज्ज्ञांनी 20:20:20 या फाॅर्मुला वापरण्याचा सल्ला दिला आहे.

सतत संगणकावर काम करणाऱ्या लोकांनी प्रत्येक 20 मिनिटानंतर 20 सेकंदासाठी 20 फूट अंतरावर असलेल्या एखाद्या वस्तूकडे पहावे, त्यामुळे डोळ्याच्या स्नायूवर पडणारा ताण कमी होते आणि डोळे दुखी कमी होते, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सतत काम करताना कधी डोळे दुखू लागले आणि पाणी येऊ लागलं तर कोमट पाण्यात स्वच्छ कपडा बुजवून डोळे पुसून घ्यावेत. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! मनमोहन सिंग यांना डेंग्यूची लागण, प्रकृतीबाबत आली ‘ही’ माहिती समोर

“आम्ही छापा टाकून काटा काढत नाही, काटा काढून छापा टाकतो”

“तुमच्या हिंदुत्वाचा बुरखा फाटका, राज्याला संकुचित मनोवृत्तीचा मुख्यमंत्री लाभला”

धोनी म्हणतो,”मी पुन्हा येईल…, मी कुठं आयपीएल सोडलंय”

ना रोहित ना विराट, बाबर आझम म्हणतो ‘हा’ खेळाडू वर्ल्ड कपमध्ये धमाका करेल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More