बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सतत बसून काम करताय का? मग वाढतोय ‘या’ गंभीर आजाराचा धोका

नवी दिल्ली| कोरोना (Corona) साथीने जगभरात हाहाकार माजवला आहे. सर्वच क्षेत्रांवर कोरोनाचे परिणाम झाले आहेत. कोरोनाचं संकट आल्यापासून देशासह संपुर्ण जगभरात वर्क फ्रॉम होम देण्यात आलं. मात्र, वर्क फ्रॉम होमचा (Work from home) शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर (Physical and mental health) परिणाम होत आहे. वर्क फ्रॉम होमच्या सवयींमुळे स्ट्रोकचा धोका वाढवू शकतो आणि मेंदूला रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास अडथळा येऊ शकतो. यासंदर्भात ‘स्ट्रोक’ या जर्नलमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

60 वर्षाखालील ज्या लोकांनी दिवसभरामध्ये 8 तास एकाच ठिकाणी बसून राहिल्याने शारिरीक हालचाल करण्याचे प्रमाण अत्यल्प झाले. 8 तास काम केलेल्या व्यक्तींच्या तुलनेत ज्या लोकांनी 4 तास कमी वेळ काम केले आणि दररोज 10 मिनिटे व्यायाम केला त्यांना कमी धोका संभवतो. परंतु, ज्या लोकांनी  8 तास एकाच ठिकाणी बसून काम केले त्यांना सातपटीने अधिक स्ट्रोक होण्याची शक्यता आहे.

ज्या क्रिया एकाच ठिकाणी अनेक तास बसून केल्या जातात त्यामुळे रक्तप्रवाह बिघडणे, लिपीड चयापचय, ग्लुकोज तसेच जळजळ होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. गंभीर बाब म्हणजे यामुळे रक्तवाहिन्यावर नकारात्मक परिणाम होऊन ह्रदयविकाराचा धोका संभवतो. तसेच स्ट्रोकचा धोका वाढण्याची शक्यता असते. तसेच वर्क फ्रॉम होममुळे निष्क्रियता, आरोग्यास हानिकारक असणारा आहार याकारणास्तव लठ्ठपणा आणि चयापचायचा विकार संभवू शकतो.

दरम्यान, या नकारात्मक परिणामांवर उपाय म्हणून व्यायाम (Exercise) करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार (American Heart Association), प्रत्येक आठवड्याला कमीत कमी  150  मिनिटे किंवा 75 मिनिटं व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच धावणे, पोहणे या सवयी स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी मदत करतात.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून शिवसेनेला अधूनमधून शेण खायला संज्या लागतो – निलेश राणे

शुभमंगल सावधान! अखेर विकी-कतरिना अडकले लग्नबंधनात

“शरद पवारांचं ठरलंय, 2024 मध्येही उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करायचंय”

शेतकरी आंदोलन अखेर मागे! मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या पाच मागण्या मान्य

आधी अल्टीमेटम, मग हकालपट्टी! आता बीसीसीआय म्हणते, “Thank you Kohli”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More