बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी उभी राहिली तर 1 कोटी लोक नक्की जमा होतील”

नवी दिल्ली | माझ्या पहिल्या भारत भेटीदरम्यान 1 कोटी लोक माझ्या स्वागतासाठी उभे असतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला सांगितलं आहे, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याचा बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी समाचार घेतला आहे.

ट्रम्प यांच्या स्वागतासाठी 1 कोटी लोक जमा होतील.  हे शक्य आहे, अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान, शाहरूख खान, कटरीना कैफ, दीपिका पादुकोण आणि सनी लियोनी यांना ट्रम्प यांच्या बाजूला उभं केल्यास हे शक्य आहे, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला आहे.

राम गोपाल वर्मा यांना ‘ट्रम्प यांच्या स्वागतासाठी 1 कोटी लोक जमा होतील’ हे रुचलं नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्यांनी ट्विट करत खिल्ली उडवली आहे.

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारीला भारत भेटीवर येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

“एमआयएम आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू”

शरद पवार म्हणतात… ‘ठाकरे सरकारचा रिमोट माझ्या हाती नाही’

महत्वाच्या बातम्या-

केवळ शिवसेनेने नाही तर काँग्रेसनेही CAA समजून घ्यावा; काँग्रेस खासदाराचा घरचा आहेर

कुणालाही नको असलेली खाती मी मागून घेतली- आदित्य ठाकरे

…त्यांनी आपले आक्रमण अजून पाहिलेले नाही- राधाकृष्ण विखे पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More