बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डॉक्टर दाम्पत्याचा दिवसाढवळ्या भररस्यात गोळ्या घालून केला खून, पाहा व्हिडीओ

जयपूर | सध्या सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना रूग्णांची संख्या झापाट्याने वाढत असल्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. वाढत्या रूग्ण संख्येमुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. असं असतानाही डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता रूग्णांचा उपचार करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत आहेत.

अशातच राजस्थामध्ये माणूसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. दिवसाढवळ्या डॉक्टर दाम्पत्याना गोळ्या घालून त्यांचा खून करण्यात आला आहे. ही घटना राजस्थामधील भरतपूर येथे शहरातील हिरदास बसस्थानकाजवळ घडली आहे. ही घटना शुक्रवार 28 मे रोजी सांयकाळी 4 वाजताच्या सुमारास घडली असल्याची माहिती आहे.

हा संपूर्ण प्रकार रोडवरील सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. त्यामध्ये एक दुचाकी गाडीवर असलेल्या दोन तरूणांनी आपली गाडी एका फोर व्हिलरच्या समोर उभी केली असल्याचं दिसत आहे. गाडीवरून उतरून दोन तरूणांपैकी एकाने गाडीत असणाऱ्या डॉक्टरांना काच खाली घ्यायला लावली. त्यानंतर त्या डॉक्टर दाम्पत्याना काही कळायच्या आतच तरूणाने त्यांच्यावर गोळ्या झाडायला सुरूवात केली.

गाडीतील दाम्पत्य मृत्यूमुखी पडल्यानंतर त्या दोन तरूणांनी त्या ठिकाणाहून पळ काढला असल्याचं दिसत आहे. हा सगळा प्रकार पूर्व वैमानस्यातून घडला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, तरूणांनी केलेल्या कृत्यावर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

चीनच्या तरूणीने गायलं ‘हे’ हिंदी गाणं; व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला झटका

तीन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज, पत्नीने शिवी दिल्याचा राग आला अन् त्याने उचललं टोकाचं पाऊल

“मराठा आरक्षणाच्या हुकूमाची पाने मोदींच्याच हाती, त्यांनीच लक्ष घालावं”

BCCI ची महत्वाची बैठक; IPL 2021 आणि T20 वर्ल्ड कपबाबत होणार मोठा निर्णय 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More