बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लाखो रुपये नव्हे फक्त 10 रुपयात ‘हे’ डॅाक्टर दाम्पत्य करतंय कोरोनावर उपचार!

हैदराबाद | कोरोना महामारीने देशात प्रचंड थैमान घातलं आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असून रुग्णांच्या उपचारादरम्यान लाखो रुपयांचं बिल होत आहे. अशातच हैदराबाद येथील एक दाम्पत्य केवळ 10 रुपयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. हे दाम्पत्य तेलंगणा येथील पेद्दापल्ली गावातील आहे.

संबंधित दाम्पत्यापैकी पतीचं नाव डाॅ. राजू असं आहे तर त्यांच्या पत्नीचं नाव डाॅ. पावनी असं आहे. डॉ. राजू हे ऑर्थोपेडिक फिजिशिअन आहेत. तर डॉ. पावनी जनरल फिजीशिन आहेत. यांच्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर ते अगदी कमीत कमी दरात उपचार करतात. तर गरीबांना ते मोफत उपचार देतात. गावातील जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांना मोफत उपचार नाहीतर जास्तीत जास्त 10 रुपये फी आकारली जाते.

या डॉक्टरांची सामान्य फी 300 रुपये होती. पण कोरोना महासाथीचं संकट लक्षात घेता त्यांनी आपली फी फक्त 10 रुपयांवर आणली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आणि इतर रुग्णांची सेवा करताना आम्हाला खूप अभिमान वाटतो, असं हे डॉक्टर दाम्पत्य सांगतं. त्यांना पैशांशी काहीही घेणंदेणं नाही, तर रुग्णांचा जीव वाचवणं यासाठीच त्यांची धडपड सुरू आहे.

दरम्यान, या गावातील लोक हातात पैसे नसले तरी योग्य ते उपचार घेऊ शकतात. या रुग्णालयात त्यांना आवश्यक ती आरोग्य सेवा मिळते. तसेच या डॉक्टर दाम्पत्याने कोरोना महासाथीच्या काळात सर्वांसमोर एक मोठा आदर्श ठेवला आहे.

थोडक्यात बातम्या-

“कोरोना हा आजार नाही, अल्लाहसमोर रडत माफी मागितल्यास तो नष्ट होईल “

महिला म्हणाली, “शाहरुखला भेटूनही इतका आनंद झाला नाही!; मोदींचं स्मितहास्य…

35 वर्षाय महिलेकडून 16 वर्षाच्या मुलावर… अत्यंत धक्कादायक माहिती आली समोर

चालतं-फिरतं जिवंत मॅगनेट; व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

“तुमचे मंत्री काका-पुतण्यापुढे लाचार, मी सोनिया गांधींकडे तक्रार करणार”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More