नवी दिल्ली | कोरोना व्हायरसमुळे बहुतांश देशातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. चीनमधून प्रसार झालेल्या कोरोनाचा विषाणू आता भारतातील बहुतांश राज्यात पसरला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे रुग्णालयातील नर्सपासून ते आरोग्यमंत्र्यांपर्यंत सर्वजण दिवसरात्र झटताना दिसत आहेत. या डॉक्टर्स आणि स्टाफच्या कार्याचं नागरिकांकडून कौतुक होतंय. अशाच एका डॉक्टरचं आवाहन आता प्रचंड व्हायरल होत आहे.
दिल्लीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टर अमरेंद्र सिंग यांनी नागरिकांसाठी एक संदेश दिला आहे. मी तुमच्यासाठी रुग्णालयात काम करतोय, तुम्ही आपल्यासाठी घरी बसा, असा भावनिक संदेश डॉक्टर अमरेंद्र सिंग यांनी दिला आहे.
दरम्यान, प्रसार भारतीच्या ट्विटर हँडलवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे.
A public message from a resident doctor of Safderjung hospital in Delhi.#COVID19 #coronavirus pic.twitter.com/6N1YaFgSQE
— Prasar Bharati News Services (@PBNS_India) March 18, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
धक्कादायक! कोरोनामुळे इटलीत एका दिवसात 475 जणांचा मृत्यू
कोरोनाला घालवण्यासाठी केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा वाढला, आणखी दोन महिलांना लागण
“राहुल गांधींनी कार्टून चॅनलऐवजी न्यूज चॅनल पाहावं”
मुंबई महापालिकेने दंड वाढवल्यावरही थुंकोबांकडून एका दिवसात तब्बल इतका दंड वसूल
Comments are closed.