बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आजारातून बरा झाल्यावर एक झाड लाव’; सोशल मीडियावर डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन तुफान व्हायरल

अहमदनगर | सध्या सगळीकडेच कोरोना पेशंटना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनअभावी अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे ऑक्सिजनची खरी किंमत आता आपल्याला कळत आहे. अशा रुग्णांवर उपचार करणाऱ्या अहमदनगरमधील एका डॉक्टरने रुग्णांना ऑक्सिजनचं महत्त्व कळावं म्हणून एक शक्कल लढवली आहे.

अहमदनगर येथील संजीवनी रुग्णालयातले डॉक्टर युवराज कासार यांच्या प्रिस्क्रिप्शनवर औषधांच्या जोडीनं लिहिलेला मजकूर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. औषधांची नावं आणि ती कशी घ्यायची हे लिहिल्यानंतर खालच्या बाजूला आजारातून बरे झाल्यावर एक झाड लावा. तुम्हाला ऑक्सिजन कमी पडणार नाही, असा मजकूर डॉक्टर युवराज कासार यांनी लिहिला आहे.

कोविड संकटाच्या काळात गेल्या महिन्याभरापासून आमच्या संजीवनी हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या प्रिस्क्रिप्शनवर अगदी सहज म्हणून हा मजकूर लिहिला होता. आजही लिहितो. वैद्यकीय व्यावसायिक असल्यानं उपचारांमध्ये ऑक्सिजनचं महत्त्व अर्थातच जाणून आहे. मी आयुर्वेदाचा विद्यार्थी आहे. आमची बहुसंख्य औषधे थेट वनस्पती, वृक्ष, वेलींपासूनच बनवली जातात. नास्ति मूलं अनौषधम् हे वचनही सर्वज्ञात आहे. मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन झाडे देतात हेही आपल्याला माहिती आहे, असं डाॅ. युवराज कासार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, डाॅ. युवराज कासार आणि त्यांच्या पत्नी डाॅ. कोमल कासार हे दोघेही गेल्या 12 वर्षांपासून अहमदनगरपासून दहा किलोमीटर अंतरावरच्या वाळकी येथे संजीवनी हॉस्पिटल चालवतात. कोरोना संसर्गाच्या संकटात हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना औषधं लिहून देताना झाडे लावण्याचा, संदेश देऊन त्यांनी वैद्यकीय सेवेसह सामाजिक बांधिलकीही जपली आहे.

 

Photo Credit – Social Media/Screen Shot

 

थोडक्यात बातम्या

“अनिल देशमुखांवर झालेली कारवाई ही सोची समझी चाल, लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होईल”

अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल; संजय राऊत म्हणाले ‘कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही’

सलग 15 व्या दिवशी मुंबईत लोकलला प्रचंड गर्दी; ‘मुंबईकरांनो हे वागणं बरं नव्हं!’

अयोध्या वादावर शाहरूख खाननं सुचवला होता हा तोडगा; शरद बोबडेंच्या निरोप समारंभात मोठा खुलासा

‘फी भरली नाही म्हणून परिक्षेला बसू न दिल्यास…’; शिक्षण विभागाने केलं हे महत्वाचं आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More