शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, सक्तीचा आराम करण्याची डॉक्टरांची सूचना
मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास वाढल्यानं मंगळवारी रात्री त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी त्यांना मंगळवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात भरती करण्यात आलं होतं. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सक्तीचा आराम करण्याची सूचना डॉक्टरांनी पवारांना दिली आहे.
पाच दिवसानंतर त्यांना रूग्णालयातून सोडण्यात आलं आहे. काही चाचण्या केल्यानंतर शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतच्या काही समस्या दिसून आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर गेली 4 दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं.
पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली असून कुणालाही बंगल्यात येण्याची परवानगी देण्यात आली नाही. पुढील सात दिवस ते घरातच आराम करत राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. मंगळवारी रात्री शरद पवारांवर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यानंतर शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांचा रूग्णालयातील फोटो शेअर केला होता.
दरम्यान, शरद पवारांची 15 दिवसानंतर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांची प्रकृती उत्तम असेल तरच ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात येणर आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितल आहे.
थोडक्यात बातम्या-
“टीका करणं सोपं आहे, पण उद्धव ठाकरे होणं अवघड”
“माझ्या औषधाला परवानगी द्या, कोरोना झटक्यात बरा करतो”
“पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोरोनाशी लढतोय, तरीही धीरोदत्तपणे हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय”
“तुम्ही फक्त कपडे बदलून फेसबुक लाईव्ह करायला मुख्यमंत्री झालात का?”
मुलाचं लग्न बघायचं त्यांच्या नशिबातच नव्हतं, 5 दिवस आधीच आई वडिलांना ट्रकनं चिरडलं
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.