Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर (Attack) त्याला मिळालेल्या वैद्यकीय विम्यामुळे (Medical Insurance) तो अडचणीत येण्याची शक्यता आहे. सैफवर १६ जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्यानंतर पाच दिवस त्याच्यावर लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) उपचार करून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला. या उपचारांसाठी निवा बुपा (Niva Bupa) या विमा कंपनीने त्याला तातडीने वैद्यकीय विमा मंजूर केला होता. मात्र, आता सेलिब्रिटी (Celebrity) असलेल्या सैफसाठी एवढ्या वेगाने मदतीला धावलेल्या कंपनीविरोधात वैद्यकीय क्षेत्रातील काही तज्ज्ञ मंडळींनी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाला (IRDAI) पत्र लिहिले आहे. सैफ प्रकरणात ‘विशेष प्राधान्यक्रम’ (Special Preference) देण्यात आल्याची तक्रार वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी केली आहे.
२५ लाखांचे कॅशलेस उपचार मंजूर
सैफ अली खानवर (Saif Ali Khan) त्याच्या वांद्रे (Bandra) येथील सदगुरु शरण इमारतीतील (Sadguru Sharan Building) राहत्या घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या बांगलादेशी चोराने (Bangladeshi Thief) चाकूने हल्ला केला होता. यानंतर सैफला पहाटेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया (Surgeries) पार पडल्या. यासाठी सैफचा मेडिक्लेम (Mediclaim) तातडीने मंजूर करण्यात आला. सोशल मीडियावर (Social Media) यासंदर्भातील कागदपत्रेही व्हायरल झाली. या कागदपत्रांनुसार, सैफच्या उपचारांसाठी ३६ लाखांच्या कॅशलेस उपचारांसाठी (Cashless Treatment) अर्ज करण्यात आला होता. या पैशांमध्ये पाच दिवस सैफवर रुग्णालयात उपचार केले जातील असे दर्शवण्यात आलेले. मागण्यात आलेल्या पैशांपैकी विमा कंपनीने २५ लाखांचे कॅशलेस उपचार मंजूर केले. निवा बुपा या विमा कंपनीने प्री-ऑथोरायझेशन रिक्वेस्ट (Pre-Authorization Request) मंजूर केल्याचे सांगितले असून पुढील रक्कम नियमांनुसार दिली जाईल असे म्हटले आहे.
१४०००+ डॉक्टरांच्या संस्थेचा आक्षेप
मुंबईमधील वैद्यकीय सल्लागारांच्या असोसिएशनने (Association of Medical Consultants) आयआरडीएआयला (IRDAI) पत्र लिहिले आहे. या संस्थेमध्ये एकूण १४ हजारांहून अधिक डॉक्टर्स असून अनेक शहरांमध्ये या संस्थेच्या शाखा आहेत. या पत्रामध्ये सैफला ज्या पद्धतीने कॅशलेस उपचारांसाठी विमा कंपनीने परवानगी दिली त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे.
“अभिनेता सैफ अली खानला त्याच्या विमा योजनेअंतर्गत २५ लाख रुपयांचे कॅशलेस उपचार मंजूर करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून आम्ही आमचा आक्षेप आणि चिंता नोंदवू इच्छित आहोत. इतर विमाधारकांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीपेक्षा सैफला देण्यात आलेली वागणूक ही विशेष आणि प्राधान्यक्रमाने होती,” असे या पत्रात म्हटले आहे.
‘विशिष्ट विमाधारकांना खास वागणूक’
सैफ अली खान (Saif Ali Khan) प्रकरणामधून काही विशिष्ट विमाधारकांना खास वागणूक दिली जात असल्याचा ट्रेंड दिसून येत असल्याबद्दलही डॉक्टरांच्या संस्थेने चिंता व्यक्त केली आहे.
“या प्रकरणावरून एक धक्कादायक ट्रेंड दिसून येत आहे ज्यामध्ये सेलिब्रिटी आणि उच्चभ्रू व्यक्तींबरोबरच कॉर्पोरेट विमा योजना (Corporate Insurance Policy) असलेल्यांना त्यांच्या सोयीनुसार आणि अधिक रक्कमेचे कॅशलेस उपचार दिले जात असताना सर्वसामान्य नागरिकांना गरजेपेक्षा कमी विमा संरक्षण आणि कमी दराने वैद्यकीय उपचारांचा परतावा (Reimbursement) यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे,” असे संस्थेने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
Title: doctors object to saif ali khan 25 lakh cashless treatment alleging special preference