बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! न्यायालयाचा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दणका, आता…

मुंबई | राज्यासह देशात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांचं प्रकरण गाजलं होतं. परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणीचे आरोप केले आहेत. परिणामी सध्या देशमुख हे कारागृहात आहेत. अशातच आता दिल्ली विशेष न्यायालयानं (Delhi Court) अनिल देशमुख यांच्या अडचणीत भर टाकणारा निकाल दिला आहे.

दिल्ली विशेष न्यायालयानं सीबीआयला कागदपत्रे लीक करण्याच्या प्रकरणात अनिल देशमुख यांची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सीबीआयनं गाडीचं इंजिन सोडून फक्त गाडीतून प्रवास करणाऱ्यांना पकडलं आहे. इंजिन किंवा घोडा ओढल्याशिवाय गाडीची स्वारी नसते, असं म्हणत न्यायालयानं देशमुख यांच्या अधिक चौकशीचे आदेश दिले आहेत.

देशमुख यांच्या टीमनं सीबीआयच्या काही अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी देशमुख यांना क्लिन चिट दिल्याची काही कागदपत्रे व्हायरल झाली होती. यावरून न्यायालयानं प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. देशमुख यांच्या अडचणीत न्यायालयाच्या या निर्णयानंतर आणखीनच वाढ होणार आहे.

दरम्यान, सीबीआयकडून सध्या अनिल देशमुख यांची कागदपत्रे लीक प्रकरणी चौकशी चालू करण्यात आली आहे. या चौकशीचा अहवाल न्यायालयात 4 आठवड्यांमध्ये सादर करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या 

‘काही झालं की भाजपच्या महिला नेत्या बोंबलत सुटतात’; शिवसेना आमदाराचे बिगडे बोल

पत्रकार परिषद घेत करूणा मुंडेंचा खळबळजनक खुलासा, म्हणाल्या…

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार?; अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती

नितेश राणेंना मोठा धक्का; ‘या’ प्रकरणी चौकशी होणार

“अजित पवारांकडून एकदा चूक झाली, तुम्ही सारखं सारखं बोलणार का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More