बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रपतींचा शपथविधी 25 जुलैलाच का होतो?, वाचा सविस्तर

नवी दिल्ली | आपल्या भारत देशाच्या इतिहासात अनेक राष्ट्रपतींनी आजच्या दिवशी म्हणजे 25 जुलै रोजीच शपथ घेतली. त्यामुळे 25 जुलै ही शपथ घेण्याची शासकीय तारीख आहे का? किंवा 25 जुलै आणि राष्ट्रपतींची शपथ याचा काही कायदेशीर संबंध आहे का? असा प्रश्न काहींच्या मनात निर्माण झाला आहे. सर्वप्रथम नीलम रेड्डी (Nilam Reddi) यांनी 25 जुलै, 1977 रोजी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. त्यानंतर पाच वर्षांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आणि ज्ञानी जैल सिंह (Zail Singh) यांनी 25 जुलै, 1982 ला राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. त्यानंतर हा पायंडा पडला आणि दर पाच वर्षांनी नवीन राष्ट्रपती 25 जुलै रोजीच शपथबद्ध होत गेले.

इंदिरा गांधी (Indira Gandhi)  सरकारने 1975 ते 1977 या कालावधीत देशात आणीबाणी (Emergency) लागू केली. आणीबाणी नंतर झालेल्या प्रथम निवडणुकीत जनता दलाच्या नेते नीलम रेड्डी हे विजयी झाले. त्यांनी 25 जुलै, 1977 रोजी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. त्यानंतर 25 जुलै, 1982 रोजी रामास्वामी वेंकटरमन (Ramaswami Venkatraman) यांनी शपथ घेतली. शंकरद्याल शर्मा (Shankardayal Sharma) यांनी 25 जुलै, 1992 रोजी तर के. आर. नारायण (K R Narayan) 25 जुलै, 1997 रोजी शपथबद्ध झाले.

त्यानंतर मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम (APJ Abdul Kalam) यांनी 25 जुलै 2002 रोजी देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. प्रतिभा पाटील (Pratibha Patil) यांनी 25 जुलै 2007 रोजी शपथ घेतली. प्रणव मुखर्जी (Pranab Mukharjee) यांनी 25 जुलै 2012. त्यानंतर रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी 25 जुलै 2017 रोजी शपथ घेतली होती आणि आता देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून दौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी आज 25 जुलै 2022 रोजी शपथ घेतली.

दरम्यान, यापूर्वीच्या सर्व राष्ट्रपतींचा जन्म पारतंत्र्यात झाला होता. स्वतंत्र भारतात ज्यांचा जन्म झाला अशा मुर्मू पहिल्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. तसेच त्या देशातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती असून प्रतिभा पाटील यांच्यानंतर त्या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. आज सकाळी देशाच्या संसद भवनात अनेक मोठ्या नेत्यांच्या आणि मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत त्यांना सरन्यायाधिश एन. व्हि. रमणा (CJI N V Ramana) यांनी पदाची आणि गोपनियतेची शपथ दिली.

थोडक्यात बातम्या – 

सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यतेल तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी स्वस्त, वाचा ताजे दर

‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पहिला प्रोमो आला समोर

15व्या राष्ट्रपती म्हणून दौपदी मुर्मूंनी घेतली शपथ, सर्वोच्चपदी झाल्या विराजमान

‘त्या’ भाषणावरून निलेश राणेंची शरद पवारांवर टीका, फोटो शेअर करत केला भांडाफोड

‘पक्ष पळवला आता वडील पळवत आहात, तुम्ही बंडखोर नव्हे दरोडेखोर’; उद्धव ठाकरे आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More