लसीकरणानंतर मद्यपान केल्यास विपरीत परिणाम होतात का? तज्ज्ञ डॉक्टरांचे स्पष्टीकरण
मुंबई | देशभरात कोरोनाविरोधात लढण्यासाठी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनात लसीकरण आणि त्यानंतरच्या परिणामांविषयी अनेक प्रश्न आणि संभ्रम आहेत. त्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला प्रश्न म्हणजे कोरोनाची लस घेतल्यानंतर मद्यपान केल्यामुळे लसीचा प्रभाव कमी होतो का? किंवा त्याचे आरोग्यावर काही विपरीत परिणाम होतात का? यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयासोबतच काही तज्ज्ञ डॉक्टरांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे.
आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची लस घेतल्यानंतर मद्यपान केल्यास त्यामुळे लसीचा प्रभाव कमी होतो, असा कोणताही पुरावा अद्याप सापडलेला नसल्याचे म्हटले आहे. मात्र, असे असले तरी लसीकरणानंतर मद्यपान केल्यास, आणि विशेषत: अती मद्यपान केल्यास, त्याचा परिणाम होऊ शकतो, असे काही तज्ज्ञ डॉक्टरांच्या मत आहे. यासंदर्भातील वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे.
लसीकरणानंतर देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांमध्ये मद्यपानाचा समावेश नसला, तरी लस घेतल्यानंतर किमान एक आठवडा तरी मद्यपान टाळायला हवे. त्याचबरोबर तुम्ही जर मद्यपान केलेच, तर ते नियंत्रणात असणे आवश्यक आहे. रोज मद्यपान तर टाळायलाच हवे, असं स्पष्टीकरण मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातील डॉक्टर किर्ती सबनीस यांनी दिलं आहे.
दरम्यान, जास्त प्रमाणात मद्यपान केले, तर लसीमुळे होणारे साईड इफेक्ट्स झाकले जाण्याचा धोका आहे. लस घेतल्यानंतर जर तुम्हाला अंगदुखी, त्वचेवर रॅशेस किंवा ताप असा काही त्रास होऊ लागला, तर मद्यपानामुळे तो जाणवणार नाही आणि त्यावर तातडीने उपचारांची आवश्यकता असली, तर ते करता येणार नसल्याचे देखील डॉ. किर्ती सबनीस यांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या –
‘आयपीएल’ सुरू होण्यास फक्त 6 दिवस शिल्लक असताना; ‘या’ मैदानात खेळाडूंच्या आधी कोरोनाची ‘एन्ट्री’
हळद उतरली नाही तोच वाहिला रक्ताचा पाट, रक्तरंजीत घटनेनं सोलापूर हादरलं!
उद्धव ठाकरेजी, थोडा अभ्यास करत जा! चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंंत्र्यांना टोला
‘काही द्यायचं नाही आणि नियम लावायचे’; पुण्यातील मिनी लॉकडाऊनला भाजपचा कडाडून विरोध
रुग्णसंख्या वाढली, कोरोना बळीही वाढले, कोरोनाचा कहर; ‘या’ देशात संपूर्ण लाॅकडाऊन घोषित
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.