बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिंदे गट मनसेमध्ये विलीन होणार?; महत्त्वाची बातमी समोर

मुंबई | एकनाथ शिंदे गटाविरुद्ध शिवसेनेने कायदेशीर लढा सुरु केला आहे. शिंदे गटाच्या एकूण आमदारांपैकी 16 आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने केली आहे. त्याविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दोनही बाजूंनी आग पेटली असून न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा सर्वांना आहे.

शिंदे गटाने बंड करुन आता 7 दिवस लोटले आहेत. अद्याप त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. तेव्हा त्यांच्यावर पक्षांतर बंदीच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊन कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यांना जर ही कारवाई टाळायची असेल तर त्यांना दोन तृतीआंश आमदारांसह एखाद्या पक्षात प्रवेश करणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांना भाजप आणि मनसे असे दोन पर्याय आहेत.

शिवसेनेचे विधानसभेत 55 आमदार आहेत. त्यातील 39 आमदार सध्या शिंदे गटात आहेत. शिंदे गटाकडे सध्या 2 आमदार जास्त आहेत. तसेच शिवसेनेचे आपले म्हणता येण्यासारखे मोठ्या खात्यांवरचे मंत्री सुद्धा एक-एक करुन शिवसेनेतून पलायन करुन शिंदे गटात जात आहेत. शिंदे गटाने बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेत विलीन व्हावे, असे शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे म्हणाल्या होत्या. पण आता शिंदे गटाला विलीनीकरणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पर्याय असू शकतो का? अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सध्याच रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती. राज ठाकरे यांनी अजून तरी यावर काही भाष्य केलेलं नाही.

थोडक्यात बातम्या –

“शेवटच्या आमदाराला सुद्धा ऑफर देण्यात आली होती पण, बाबा ओरडतील म्हणून नाही आला”

“40 बंडखोर आमदारांच्या फक्त बॉड्या महाराष्ट्रात येणार”

बंडखोर आमदारांना ‘नाच्या’ म्हणत राऊतांचा गंभीर इशारा, म्हणाले…

“हवा, पाणी, डोंगर, हॉटेल आपल्या राज्यातही आहे, या इकडे”

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More