बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्याला काही लाज, लज्जा, शरम आहे की नाही?’; भर पत्रकार परिषदेत अजित पवार संतापले

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा मुंबईतील धाड सत्र सुरू आहे. 3 आठवड्यापूर्वी सिनेअभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केली आहे. त्यानंतर आता मुंबई ड्रग्ज प्रकरणात धाडी टाकल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. त्यानंतर आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

मला संपूर्ण राज्य ओळखतं. तरीही माझा फोटो व्हायरल केला गेला. फोटो व्हायरल करणाऱ्याला लाज, लज्जा, शरम आहे की नाही?, असा संतप्त सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. मी अलिकडे पाहिलंय, मीडियाने दखल घेतली पाहिजे अशी नावं सध्या घेतली जात आहे, असंही अजित पवार म्हणाले.

एनसीबीने धाडी मारल्या होत्या त्यावेळी एका बड्या व्यक्तीच्या मुलाचं नाव समोर येत होती. त्यावेळी पार्थ पवार यांचं नाव आल्याची चर्चा सुरू होती. त्यावर अजित पवारांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे काही असेल ते तपासा. उगाच कोणाच्या मुलाचं नाव घेऊन त्याचं करियर बरबाद का करता?, असा सवाल देखील अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, काही असेल तर त्या संबंधित व्यक्तीला शिक्षा करा. माझ्या घरातला असो, तुमच्या घरातला असो किंवा इतरांच्या घरातला असो, सर्वांना नियम हे सारखेच असले पाहिजे. सर्वांना नियम हे सारखेच असतात, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“बॉलिवूड बाहेर घेऊन जाण्यासाठी काही मुख्यमंत्री आले होते पण…”

“केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी केला जातोय”

धावत्या रेल्वेमध्ये चढताना महिलेचा पाय घसरला, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

“अभिनेता आमिर खानने हिंदूच्या भावना दुखावल्या”

100 कोटी डोसचं लक्ष्य खरोखरच पूर्ण झालंय का?- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More