बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘किस करणं मराठी अभिनेत्रींना शोभतं का?’, ट्रोलर्सना तेजस्विनी पंडितचं उत्तर

 मुंबई | सिनेसृष्टीमध्ये अनेक कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.  प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने अभिनेता स्वप्नील जोशीसोबत किस करताना एक सीन दिला आहे. यानंतर आता मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच उत्तर दिलं आहे. मराठी अभिनेत्रींना किस करणं शोभत का?, या प्रश्नाला तेजस्विनीने रोखठोकपणे उत्तर दिलं आहे.

तेजस्विनीने एका मुलाखती दरम्यान उत्तर देत असताना आम्ही अभिनय करत असतो आणि ती व्यक्तिरेखा रंगवताना त्याची गरज म्हणून काहीवेळी असे सीन द्यावे लागतात. तो त्या कथानकाचा, व्यक्तिरेखेचा भाग असल्याचं म्हटलं आहे. तसेच अशी दृश्य देणं सोपं नसून लोकांना ट्रोल करणं सोपं असल्याचं देखील तेजस्विनीने म्हटलं आहे.

या मुलाखतीत तेजस्विनीने उत्तर देत लोकंही अशाच लोकांना ट्रोल करतात जे चर्चेत असतात, असं म्हटलं आहे. तसेच याचं एक उद्दाहरण देताना समांतरच्या पहिल्या सीझनमध्ये सुरुवातीला त्याची चर्चा झाली मात्र नंतर समांतरचा पहिला सीझन इतका गाजला की ही गोष्ट मागे पडल्याचं तेजस्विनीने सांगितलं आहे.

दरम्यान, समांतर ही सीरिज नामांकित मराठी लेखक सुहास शिरवळकर यांच्या समांतर या कादंबरीवर आधारित आहे. दोन भिन्न व्यक्ती व्यक्तीचं आयुष्य एकाच हस्तरेखेवर आधारित आहे. म्हणजे एकाचा भूतकाळ हा दुसऱ्याचा भविष्यकाळ असणार आहे. असं या सीरिजचं कथानक आहे. त्यामुळं भविष्य काळात होणाऱ्या वाईट घटना स्वप्नील जोशी रोखू शकेल का?, हे याचं उत्तर सांगणारी ही सीरिज आहे.

थोडक्यात बातम्या-

अनिल देशमुखांना बार मालकांनी दिले तीन महिने 4 कोटी रूपये; ईडीचा धक्कादायक खुलासा

….म्हणून अभिनेत्री पायल रोहतगीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सोन्या-चांदीचे भाव पुन्हा उतरले, वाचा आजचे ताजे दर

“खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत”

जवानानं धावत्या रेल्वेतून कोसळणाऱ्या प्रवाशाचे वाचवले प्राण, रेल्वेमंत्र्यांकडून कौतुकांचा वर्षाव

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More