Honey Bee Sting l मधमाशी चावल्यानंतर लोक अनेक प्रकारचे उपाय करतात. त्यातील एक प्रसिद्ध उपाय म्हणजे चावल्यानंतर लोखंड घासणे. पण खरोखरच यामुळे वेदना आणि सूज कमी होते का? चला तर जाणून घेऊया यामागील सत्य.
मधमाशीचा डंख कसा कार्य करतो? :
मधमाशी आपल्या पोळ्याचे संरक्षण करण्यासाठी डंख मारते. मधमाशी चावल्यावर तिचा डंख त्वचेमध्ये रुततो आणि तो विषारी द्रव बाहेर सोडतो. यामुळे त्या भागावर लालसरपणा, सूज आणि तीव्र वेदना जाणवतात. काही लोकांना याची ऍलर्जी देखील होते, ज्यामुळे अतिरेकी सूज आणि श्वास घेण्यास अडचण निर्माण होऊ शकते.
लोकांमध्ये असा समज आहे की, मधमाशी चावल्यानंतर त्या भागावर लोखंड चोळल्याने वेदना आणि सूज कमी होते. काहीजण चावी, कुलूप, चिमटा किंवा लोखंडी वस्तू त्या जागी ठेवतात. यामागील प्रमुख कारण म्हणजे, लोकांना वाटते की लोखंडामुळे विष काढून टाकता येते.
Honey Bee Sting l खरंच लोखंड उपयोगी आहे का? :
– प्रत्यक्षात लोखंडाचा मधमाशीच्या विषावर कोणताही प्रभाव पडत नाही.
– मधमाशीच्या डंखामुळे होणारी सूज ही विषामुळे होते आणि लोखंड त्यावर कोणताही रासायनिक प्रभाव टाकत नाही.
– त्यामुळे, लोखंड घासण्याचा उपाय हा फक्त एक गैरसमज आहे.
– काही वेळा थंड लोखंडी वस्तू लावल्याने थोडासा आराम मिळू शकतो, पण तो मुख्यतः थंडामुळे असतो, लोखंडामुळे नव्हे.
– त्यामुळे लोखंड वापरण्याऐवजी योग्य उपचार करणे अधिक फायदेशीर ठरेल.
मधमाशी चावल्यानंतर काय करावे? :
– मधमाशीचा डंख त्वचेमध्ये राहिल्यास तो विष बाहेर टाकत राहतो. त्यामुळे तो ताबडतोब काढून टाका.
– चावल्यानंतर बर्फाचा उपयोग केल्यास वेदना आणि सूज कमी होऊ शकते.
– हळद आणि मध एकत्र करून लावल्यास नैसर्गिकरित्या सूज कमी होते.
– त्वचेला थंडावा मिळवण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी अॅलोवेरा प्रभावी ठरतो.
– बेकिंग सोड्याचा लेप लावल्यास विषाचा प्रभाव कमी होतो आणि वेदना दूर होतात.
– जर सूज जास्त असेल किंवा श्वास घेण्यास अडचण येत असेल, तर तातडीने डॉक्टरांकडे जा.